Breaking News

शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा

Advertisements

शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र
अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा
चंद्रपूर, दि. २६ मार्च : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकèयांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून त्यांचे कुटूंबाला प्रत्येक प्रकरणी एक लक्ष रुपये सानुग्रह मदत त्वरीत देण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले आहेत.
जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. याअंतर्गत एकूण २३ प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यापैकी १५ प्रकरणे पात्र, ५अपात्र तर २ प्रकरणांची फेरतपासणी करण्यात येणार आहे.
पात्र प्रकरणात कोरपना तालुक्यातील निमणी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी मंगेश तिखट, कोठोडा बु. येथील मोतीराम तोडासे, राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील प्रभाकर वैद्य, विरूर स्टे. येथील गुलाब गोहणे व सुरेश दोरखंडे, पाचगाव येथील शंकर बोरकुटे, टेकामांडवा येथील विक्रम सोडनर, नागभिड तालुक्यातील मोहाडी येथील बळीराम शेंडे, चंद्रपूर तालुक्यातील दाताळा येथील महादेव येलमुले, ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील जिवन उंदीरवाडे व जगन्नाथ राऊत, गणेशपूर येथील अनिल गुरनुले, सौन्द्री येथील नंदकिशोर राऊत, चिंचोली बुज. येथील नामदेव ढोरे, वरोरा तालुक्यातील राजू जेवुरकर यांच्या प्रकरणांचा समावेश आहे.
बैठकीला पोलीस विभाग, आरोग्य व कृषी विभागाचे तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा अग्रणी बँक व कृषी विकास अधिकारी कार्यालयाचे संबंधीत अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी तालुक्यातील पिकांचे नुकसान : पाऊस इतका झाला नसताना शेतात आणि घरात पाणी

गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये …

टमाटरचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात : टमाटरवर फिरवला नांगर

वेळेला पैशापेक्षाही खूप महत्व आहे. हीच बाब टमाटरला लागू पडते. पंधरवडय़ापूर्वी प्रतिकिलो २०० रुपयांचा विक्रमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *