Breaking News

चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक ,चंद्रपूरचे तापमान 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस

चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक
चंद्रपूरचे तापमान 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस

चंद्रपूर- विदर्भातच नव्हे, तर अख्ख्या जगात अनेकदा चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक राहिले आहे. यंदा मात्र मे महिना उजाडण्याच्या आधीच आणि कोरोनाच्या सावटात एप्रिल हिटचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागत आहे. गत तीन दिवसांपासून उन्हाचा पारा बराच चढला आहे. गुरूवारी भर दुपारी महानरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. चंद्रपूर 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केल्या गेली.
मे हिटचा जबरदस्त धसका नागरिकांनी एप्रिलच्या सुरूवातीलाच घेतला. विदर्भात चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. ब्रम्हपुरीचे तापमान दुसर्‍या स्थानावर नोंदल्या गेले. त्यापाठोपाठ अकोला 41.6, नागपूर 40.6, वर्धा 40.5, यवतमाळ 40.5, गडचिरोली 41.2, तर गोंदिया जिल्ह्यात 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
गुरूवारी दुपारी महानगरात फेरफटका मारला असता, तप्त उन्ह चटके देत होते. त्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाजारपेठेतही शुकशुकाट बघायला मिळाला. येथील शासकीय कार्यालयात कामकाजाच्या दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी दिसली नाही. स्थानिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावर प्रत्येक प्रवासी झाडांच्या आडोशाला आसरा घेताना दिसला.
‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात गाजतो. सर्वाधिक तापमानाची नोंद अनेकदा चंद्रपूर जिल्ह्यात होत असते. गेल्या पाच दिवसांपासून 39 ते 40 अंश तापमान येथे होते. गुरूवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके असह्य होऊ लागले होते. नागरिकांच्या घरातील कुलर्स, एसीही सुरू केल्या आहेत. कामानिमित्त घराबाहेर पडणारा नागरिक शितपेयांच्या दुकानात दिसू लागला.

About Vishwbharat

Check Also

१५ प्रवासी…भरधाव ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर भीषण धडक

प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत २ जण गंभीर जखमी तर …

रुग्णालयात आग : नर्सची हायकोर्टात याचिका

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *