Breaking News

जिल्हाधिकारी यांची स्त्री रुग्णालयाला भेट. आरोग्य सोयी-सुविधांची केली पाहणी अतिरिक्त बेड वाढविण्याचे दिले निर्देश

Advertisements

जिल्हाधिकारी यांची स्त्री रुग्णालयाला भेट.
आरोग्य सोयी-सुविधांची केली पाहणी
अतिरिक्त बेड वाढविण्याचे दिले निर्देश
चंद्रपूर दि.25 एप्रिल :- कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चालला असून जिल्ह्यात बाधित रुग्णांची मोठी भर पडत आहे. यातच नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनामार्फत योग्य त्या उपाययोजना व त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भेट देत उपलब्ध आरोग्य सोयी-सुविधांची पाहणी केली. तसेच कोविड वार्डला भेट देऊन उपलब्ध औषधसाठा, सेवा देणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीची माहिती जाणून घेतली.

Advertisements

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा उपायुक्त श्री.वाघ, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे उपस्थित होते.

Advertisements

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आज जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात अतिरिक्त 200 ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले असून सदर बेड वाढविण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. सध्या 131 बेड कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
त्यापैकी 45 आयसीयू बेड, 76 ऑक्सिजन बेड तर 10 साधे बेड असे एकूण 131 बेड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
स्त्री रुग्णालयामध्ये बायोकेमिस्ट्री,पिएसएम, पॅथाॅलाॅजी,अॅनाॅटाॅमी हे प्रशासकीय विभाग असून ते दुसऱ्या इमारतीमध्ये हलवून त्या ठिकाणी सुद्धा अतिरिक्त 200 बेड वाढविण्यात येणार आहेत.

त्यासोबतच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी लिक्विड ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्यात आली आहे.
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात व देखरेखीखाली स्त्री रुग्णालयात पूर्ण क्षमतेने आरोग्य सुविधा कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू आहे

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *