Breaking News

मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग …..

Advertisements
मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग 
प्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण होत असते.लोक प्रबोधन म्हणजे?.लोकांच्या स्वाभिमानाची जागृती,लोकांतील अज्ञानाला-अंधश्रध्देला-असहिष्णुतेला तिलांजली.लोकांना त्यांच्या स्वतंत्र व महत्त्वपूर्ण अस्तित्वाबाबत आणि चांगल्या-वाईटा बाबत सतत सजग आणि सतर्क करत राहणे. लोकांना त्यांच्या समाजाप्रती आणि राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांची तसेच हक्कांची जाणीव करून देणे, लोकांना जागृत, स्वाभिमानी, ज्ञानसंपन्न, स्वयंभू आणि स्वयंप्रकाशित करण्याची प्रक्रिया असते.राष्ट्र उभारणीसाठी आणि राष्ट्रीय विकास आणि कल्याणासाठी लोक हेच बीज भांडवल ! लोक हेच सर्वस्व.लोक प्रबोधित तर समाज जागृत आणि पर्यायाने राष्ट्र उन्नत व प्रगत असते.कोणताही देश, त्या देशातील लोक म्हणजेच पर्यायाने समाज जर जागृत नसेल तर अशा ठिकाणी विकास आणि प्रगती ह्या अवस्था आभावानेच आढळतात किंवा अर्धवट-डळमळीत स्वरुपात पाहायला मिळतात.म्हणूनच महापुरुषांच्या संतांच्या महामानवाच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर असला पाहिजे.त्यांची विचारांची आठवण करण्यासाठी त्यांचा जन्म दिन,स्मृतिदिना निमित्याने वैचारिक प्रबोधन झाले पाहिजे त्यातूनच परिवर्तन होऊ शकते त्यासाठी मी नियमितपणे जयंतीदिनी, स्मृतिदिनी आत्मचिंतन,परीक्षण करून लेख प्रपंच करीत असतो.
वैशाख पौर्णिमा शक्यपुत्र सिद्धार्थ यांचा जन्म तर वयाच्या 28 व्या वर्षी गृहत्याग,राज्यत्याग करून घोर तपश्चर्या केल्याने सिद्धार्थ गौतमाने मिळवलेली ज्ञानप्राप्ती आणि वयाच्या ऐंशीच्या वर्षी तथागत गौतम बुद्ध यांनी मिळवलेले महापरिनिर्वाण, तिन्ही वैशाख पौर्णिमेला मिळविले आहे. म्हणूनच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांनी अखंड मानव कल्याणासाठी मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग बहुजन हिताय बहुजन सुखाय मार्ग दाखविला.
जगात अनेक वस्तुचा शोध लागला त्यामुळे मानव जातीचा मोठा फायदा झाला.तथागत बुद्धानी बुद्ध पौर्णिमेला जगाला जो मानव मुक्तीचा मार्ग दाखविले त्यालाच धम्म म्हणतात. पंचशीलेचे पालन आपण केले तर दररोजच्या जगण्यातील अनेक विकार नष्ट होतात.आणि विचार आचरणात आणले तर स्वताचा विकास व कल्याण कोणीच रोखु शकत नाही.ते समजून घेण्या करीता आदर्श आणि प्रेरणा स्रोत पाहिजे. बुद्ध पौर्णिमा व बुद्धाची शिकवण मानव प्राण्याला दुःख मुक्त करण्याचा मार्ग आहे.
मानवाच्या प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. 
 मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच बुद्धांनी शील,समाधी प्रज्ञा मध्ये सांगितले आहे.
लक्षात ठेवा आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही.म्हणूनच ही बुद्ध पौर्णिमा व बुद्धाची शिकवण मानव मुक्तीचा संदेश देत असते.
भारतातील बुद्धाच्या धम्माचे ही असेच झाले बुद्धाने सांगितलेल्या धम्माचे पालन न करता ते इतरांच्या धर्मावर सतत टिका टिपणी करीत राहतात.बुद्धाच्या धम्मा बद्धल आलेला सकारात्मक विचार यांच्या आचरणातून व्यक्त होत नसल्यामुळे ते जगातील सर्व श्रेष्ठ धम्माला नकारात्मक दृष्टीने पाहतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली तथागता च्या बुद्ध धम्माची दिक्षा दिली.तेव्हा बोधिसत्व बाबासाहेब मार्गदर्शन करतात, मी तुम्हाला धम्म दिला परंतु त्याच्या अभ्यासाकरिता दर रविवारला तुम्हाला सातत्याने रविवार हा धम्म श्रवण करण्याचा दिवस म्हणून मनाला निक्षून सांगावे लागेल व सर्व बौद्धांनी रविवार दिवशी कुटुंबासह धम्माला ऐकावे लागेल.पण आज ही ९० टक्के लोक पंचशिलेचे पालन करीत नाही. पंचशील म्हणजे काय?. हेच समजत नसेल तर अंमलात आणण्याचा प्रश्नच राहत नाही.त्यामुळेच आंबेडकरी समाजात टोकाचे विकार ठासुन भरले आहेत. त्यात कोणीच अशिक्षित किंवा सुशिक्षित माघार घेण्यास तयार नाही. म्हणुन बुद्ध पौर्णिमा व बुद्ध धम्माच्या शिकवणीच्या मानव मुक्तीच्या महामार्गावर प्रत्येक मानवाने चालले पाहिजे.तो महामार्ग सोडल्यामुळे मातृसंस्था,पिपल संस्था,समता सैनिक दल, रिपाई एकूण आंबेडकरी चळवळ भक्त्त आणि शिष्यात विखुरल्या गेली आहे. नगरा नगरात हेच चित्र निर्माण झाले आहे.आज प्रत्येका कडे मैत्री भावना राहिली नाही.त्यात सत्य लिहण्याची बोलण्याची मांडण्याची हिंमत कोणी केल्यास त्यांचे परिणाम समाजात अतिशय वाईट होत आहेत.त्यामुळे कोणी बोलण्याची लिहण्याची हिंमत करीत नाही.पंचशील लागु होत नसेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्मा मधील कोणते विचार आम्हाला चालतील?.बुद्धाचे विचार आणि शिकवण ही मानवाला दुःख मुक्तीचे तत्वज्ञान देणारे आहे.ते ज्यांनी ज्यांनी स्वीकारले त्यांचा सर्व बाजूने कल्याण व विकास झाला आहे.
भारतात संतांच्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा उत्सव उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो.पण त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे आचरण केले जात नाही. परंतु बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माचा नव्हे तर धम्माचे पालन करणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा व महत्वाचा अंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होणारा उत्सव असतो.भारत ही तथागत गौतम बुद्धाची जन्मभूमी आहे. त्यांचा जन्म,ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला भारतात घडल्या त्यामुळेच त्यांचे भारताचे जागतिक पातळीवर खुप महत्व आहे. भारतातील मनुवादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी येथे तिचे वैशाख पौर्णिमाचे महत्व कितीही कमी करण्याचा प्रयत्न केला तरी मानवतावादी विज्ञानवादी बौद्ध धम्माचा सिद्धांतावरून तथागत बुद्ध जगातील सर्वोत्तम महापुरुष महानवांचे मार्ग दाते ठरले आहेत. चीन,जपान,व्हियेतनाम,थायलंड,म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर,अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशियासह जगाच्या पाठीवर १८० देशातील बौद्ध धम्म मानणारे लोक हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतात.अनेक देशात सरकारच्या वतीने बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते.भारतात बुद्ध जयंतीची सुट्टी दिली जाते.पण त्या सुट्टीचा उपभोग सरकारी,निमसरकारी प्रशासकीय यंत्रणेतील कामगार,कर्मचारी अधिकारी वर्ग मानवतावादी विज्ञानवादी बौद्ध धम्माचा सिद्धांत समजून घेण्यासाठी करीत नाही. बुद्ध पौर्णिमा व बुद्धाची शिकवण मानवाला दुःख मुक्त करण्याची असतांना त्याला मूर्तिपूजा करण्याकडे वळविला जात आहे.त्यांचे अतिक्रमणे महाबोधी महाविहारासह सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याला एक दिवस विरोध करून ते थांबणार नाही, त्यासाठी नियमितपणे प्रयत्न करायला हवेत तरच बुद्ध पौर्णिमा व बुद्धाची शिकवण आपल्याला समजून घेता येईल.
 बोधिसत्व बाबासाहेब म्हणतात, मी उपसलेले कष्ट,मी केलेला टोकाचा त्याग, याला न्याय देणे किंवा न देणे हे तुमच्या हातात आहे.परंतु तुमचे कल्याण दर रविवारला धम्म श्रवण करण्यात आहे. अश्याप्रकारे केल्यानंतरच नव्याने बौद्ध संस्कृती तुम्ही निर्माण करू शकाल आणी माझ्या कष्टाला, त्यागाला न्याय देऊ शकाल. त्यांनी अखंड मानव कल्याणासाठी मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग बहुजन हिताय बहुजन सुखाय मार्ग दाखविला. त्यामार्गाने आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जागरूक वाचकांना माझ्याकडून व माझ्या लोकप्रिय दैनिकाच्या वतीने बुद्ध प्रोर्णिमा व बुध्द जयंतीनिमित्त हार्दिक मंगल कामना!.सर्वांचे मंगल हो!!!.

सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई,९९२०४०३८५९.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *