Breaking News

32 वाळू माफियांवर गुन्हे दाखल

Advertisements

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोंदी सिद्धेश्वर पॉईंट ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातुन ट्रॅक्टर केणी द्वारे अवैध वाळू उपसा व साठा करणाऱ्या 32 जणांवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईट येथील 70 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला साठा पोलीस कॉलनीत हलविण्यात आला आहे, अशी माहिती अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे.

Advertisements

गोंदीच्या सिद्धेश्वर पॉईंटवर गुरुवारी कारवाई केल्यानंतर पुन्हा तहसीलदार व महसूल पथकाने गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईट येथील 70 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केला. गोंदी पोलीस ठाण्यात कलम 379 3 व 4 नुसार शनिवारी (दि. 1 एप्रिल) ३२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाई मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

Advertisements

अटकेतील आरोपींची नावे

फिर्यादीनंतर सादिक शेख (रा. पाथरवाला ता. अंबड), ईश्वर लहोरे, जुबेर शेख,अदनान शेख, समीर शेख, जुगन विठोरे,लहू कटे, दादासाहेब राक्षे, एजाज शेख, गजू मोरे (सर्व रा. साष्टपिंपळगाव), विकास भाऊसाहेब कनके (रा. भांबेरी ता. अंबड), मंगेश माऊली चौधरी, महेश बाळू चौधरी, कैलास पंढरीनाथ चौधरी (सर्व रा. आपेगाव), संभा नाथा मोरे (रा. पाथरवाला बुद्रुक ता. अंबड) अक्षय राजाभाऊ बाणाईत, संतोष सखाराम कांबळे, तेजस खराद, ज्ञानेश्वर देविदास खरात, आकाश सुरेश खराद, संभाजी दिनकर खराद, अशोक कुलेकर, विकास खराद, राहुल खराद, आकाश भोंडे, मनोज सुरेश खराद, दत्ता रुघनाथ शिंदे, महादेव उत्तम खराद, सोपान खराद, पाराजी बबन शिंदे, किशोर प्रभाकर खराद (सर्व रा. गोंदी) अशी अटकेतील नावे आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

नागपुरात वकील महिलेने मागितली लाखांची खंडणी

कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा सुरू केल्याप्रकरणी ‘लॉकअप’मध्ये बंद असलेल्या आरोपीच्या पत्नीकडून तोतया महिला वकिलाने वरिष्ठ पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *