Breaking News

7 पोलीस अधिकारी निलंबित : पोलीस आयुक्तांची कारवाई

Advertisements

पुण्यात गुन्हेगारी प्रचंड फोफावली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोयता गँग दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासंदर्भातील बातम्या समोर आल्या आहेत. अर्थात या कोयता गँगच्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले आहे. पण कोयता घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या आरोपींचं प्रमाण काही कमी होतानाच दिसत नाही.

Advertisements

नुकतंच एका मुलीला मारण्यासाठी भर दिवसा एक तरुण कोयता घेऊन तिच्या पाठीमागे पळत सुटला होता. पण दोन तरुणांनी या तरुणाला हटकल्याने मोठी दुर्घटना टळली. पण या घटनेनंतर पोलीस प्रशासनही खळबळून जागी झालं आहे. पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण पुण्यात योग्य दक्षता घेण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून पोलिसांवरील निलंबनाच्या कारवाईचा धडाकाच सुरु आहे.

Advertisements

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना दुसरा दणका दिला आहे. पोलीस आयुक्तांनी 2 पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षकांसह 7 जणांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. कामामध्ये हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नुकंतच सहकारनगर पोलीस ठाण्यामधील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 7 जणांना निलंबित केलं होतं. आयुक्तांच्या या कारवाईला काही तास झाले असतानाच आयुक्तांनी हा दुसरा दणका दिला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

चित्रपटाची ऑफर नाकारुन झाल्या उपजिल्हाधिकारी

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. …

मतदान में लापरवाही : अधिकारी सहित 3 निलंबित

मतदान में लापरवाही : पीठासीन अधिकारी सहित 3 निलंबित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *