रक्तदान श्रेष्ठ दान….!
नांदा येथे रक्तदान शिबीर,आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उदघाटन.
कोरपना(ता.प्र.):-
कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशात अक्षरशः थैमान घातले,आरोग्य यंत्रणा अपूरी पडली, पुर्वीपेक्षा या लाटेने अनेकांचे जीव घेतले असून बेड,आक्सिजन,औषधी इत्यादी आरोग्य विषयक साधनांसह मोठ्याप्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.हे चित्र पाहून शासनातर्फे वारंवार रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.याला प्रतिसाद देत ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे चित्र असून याच श्रेणीत कोरपना तालुक्यातील नांदा येथील युवकांनी १३ जून रविवार रोजी स्थानिक ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.राजूराचे आमदार सुभाष धोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याला हार अर्पण करून शिबिराचे उदघाटन केले.या शिबीरात ४४ युवकांनी रक्तदान केले.
शिबीराच्या आयोजनासाठी नांदा ग्रा.पं. सदस्य रत्नाकर चटप,पुरूषोत्तम निब्रड,डॉ. स्वप्नील चांदेकर,नांदा ग्रा.पं.सचिव पंढरीनाथ गेडाम,दिपक खेकारे,प्रमोद साहू,प्रवीण पोटवडे, महेश राऊत,हारूण सिद्दिकी,आतीष वासेकर,गुरूदेव तिरनकर इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.रक्तदान शिबीराची संकल्पना नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत व पत्रकार सतीष जमदाडे यांनी ठेवली होती. आमदार धोटे यांच्या हस्ते रक्तदात्यांना छत्री, सॅनिटायजर,मास्क व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी ह.प.भ. डाखरे महाराज,बिबी ग्रा.पं.उपसरपंच आशीष देरकर,काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे,युकाँ तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात युवक मित्र मंडळींनी अशाप्रकारे रक्तदान शिबीराचे आयोजन केल्यास भविष्यात रक्ताचा तुटवडा भासणार नाही असे मत यावेळी व्यक्त होत होते.रक्त संकलन शासकीय रक्तपेढी अधिकारी चंद्रपूर डाॅ.पंकज पवार,रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी जयंत पचारे, सचीन गावीत यांच्या चमूने केले.