घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त
वर्धा-
चोरी संबंधाने वर्धा शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेतील पथक पेट्रोलिंग करीत असताना दोन संशईत ईसम मोटारसायकलने गजानन नगरी, इसाजी ले-आऊट या परिसरात संशयित रित्या फिरताना दिसून आले त्यांच्या नाव पत्त्याची माहिती घेतली असता रशीद शाह हमीद शाह उर्फ तलवार सिंग वय ५४ वर्ष, रा. नायगाव अकोला, २) अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार, वय ३६ वर्ष. रा. कामठी नागपूर असे होते. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात दोन सोन्याच्या बांगड्या, दोन सोन्याचे गोफ, एक सोन्याची चैन, एक सोन्याचे मंगळसूत्र असे ७७ ग्राम वजनाचे दागिने कि.३,७८,०००/- रु. एक लिनोवा टॅब कि. १०,०००/- रु, एक नोकिया मोबाईल कि. ४०००/- रु, एक इन्फोकस मोबाईल कि ३०००/-रु, एक मोटर. सायकल कि. १५,०००/- रु, एक लेदर बॅग ५००/-रु, दोन टॉमी २००/- रु, असा जु.कि ४,१०,७००/- रु. चा माल मिळून आल्याने सदर वर्णनाच्या मालानुसार घरफोडी बाबत माहिती घेण्यात आली असता पो.स्टे. मानकापूर हद्दीत झालेल्या घरफोडीमध्ये गेल्याचे माहिती नुसार प्राप्त झाले.त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर अप.क्र. ५८७/२०२१ कलम १२२ (ड ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि. महेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार स्वप्नील भारद्वाज, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, राकेश आष्टणकर, विकास अवचट सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली