आज सर्वोच्च न्यायालयात २०० जनहित याचिकांवर सुनावणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी (दिनांक 12) तब्बल २०० हून अधिक जनहित याचिकांवर सुनावणी घेण्यात येईल.नागरिकत्व कायद्यासह (सीएए) अन्य काही महत्त्वाच्या याचिकांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सोमवारच्या कामकाज यादीत जनहित याचिकांचा समावेश आहे.
सरन्यायाधीश उदय लळित यांच्या खंडपीठासमोर ‘सीएए’वरील याचिकांची एकत्रित सुनावणी होणार आहे. २०१९मध्ये न्यायालयाने सीएएअंतर्गत कार्यवाही थांबवण्यास नकार देत केंद्र सरकारला नोटीस बजावली होती. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक याचिकांवर सोमवारी एकाच दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

About विश्व भारत

Check Also

भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर कोणती कारवाई होणार?

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग …

पहलगाम हमले के बाद पहली बार सुप्रीम कोर्ट ने उठाया बड़ा कदम

पहलगाम हमले के बाद पहली बार सुप्रीम कोर्ट ने उठाया बड़ा कदम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *