मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नाही.
आज सकाळच्या सत्रात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर, जमिनीला भेगा पडणे, भूस्खलन होणे, दरड कोसळणे यासारख्या घटना घडल्या होत्या. मदत करण्यासाठी राज्याचे नवीन पुनर्वसन धोरण आखण्यात येणार आहे.
मुंबई निवडणूक
शिवाय मुंबई महापालिका निवडणूक,अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीबाबत आढावा घेऊन ही मदत लवकरात लवकर कशी दिली जाईल यावर देखील चर्चा या बैठकीत होणे अपेक्षित आहे.