विश्व भारत ऑनलाईन :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज दुपारी साडेबारा दरम्यान ते शहरात दाखल होतील. त्यानंतर ते मंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघ पैठणमध्ये सभा घेतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
असा कार्यक्रम
दुपारी 12 दरम्यान शिंदे हे मुंबईहून शासकीय विमानाने औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळावर येतील. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता ते चिकलठाणा औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि मोटारीने पैठणकडे प्रस्तान करतील. दुपारी 1.40 वाजता संत एकनाथ महाराज मंदिरास भेट देतील आणि नाथ महाराजांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील.
दुपारी 2 वाजता कावसानकर स्टेडियम पैठण येथे ते जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी 3.30 वाजता पैठण येथून मोटारीने आपेगावकडे जातील. दुपारी 3.45 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट व दर्शन घेतील. सायंकाळी 4.15 वाजता आपेगाव, ता.पैठण येथून मोटारीने पाचोड ता. पैठणकडे प्रयाण करतील. त्यानंतर सायंकाळी 4.45 वा. संदिपान भुमरे यांच्या निवासस्थानी जातील. सायंकाळी 5.15 वाजता पाचोड ता.पैठण येथून मोटारीने आडूळ मार्गे चिकलठाणा विमानतळ औरंगाबादकडे येतील. त्यांनंतर सायंकाळी 6 वाजता चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद येथे आगमन करतील आणि शासकीय विमानाने मुंबईकडे जातील.