विश्व भारत ऑनलाईन :
अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मागील 48 तासांपासून पूरस्थिती निर्माण झाली असून ८ मार्ग बंद झाले आहेत.
बंद मार्ग
गडचिरोली-गुरवाळा, माडेमुल-रनमुल,चांदाळा-कुंभी,धानोरा-सोडे,पेंढरी-पाखांजुर,साखरा-कारवाफा,लाहेरी-बिनागुंडा,आलापल्ली -ताडगांव-भामरागड.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर अतिवृष्टी होत असल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता आणि पर्लकोटा ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडशी संपर्क तुटला आहे.
मेडीगड्डा धरणाचे ७० दरवाजे खुले
या धरणाचे दरवाजे खुले करण्यात आल्याने सिरोंचा तालुक्यातील नदीकाठावरील गावात पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. असाच पाऊस कोसळत राहिल्यास या भागातील काही गावांतील नागरिकांचे स्थलांतर करावे लागेल.