Breaking News

पावसाने पिकांचे नुकसान,’महसूल’ने करावा सर्व्हे

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे १० सप्टेंबर रोजी उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या गावांना फटका

Advertisements

तालुक्यातील शिवणी, सोनबर्डी, आलेवाडी, लाडणापूर, वसाळी, पिंगळी, करमोडा, चिचारी, सालवन , दयालनगर , हडियामाल, सोनाळा यासह इतर भागात विजेच्या गर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे.

या पिकांचे नुकसान

कपाशी, मका, सोयाबीन पीक पूर्णता जमीनदोस्त झाले आहे. तसेच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या पावसाचा परिणाम उत्पन्नावर देखील होणार आहे. तरी ऐन पीक उत्पन्न वाढीच्या बहरात असताना झालेला हा वादळी पाऊस शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

किसानों को राहत : चना, मसूर एवं राई सरसों के उपार्जन का कार्य प्रारंभ : गेहूं उपार्जन के 35 केंद्र निर्धारित 

चना, मसूर एवं राई सरसों के उपार्जन का कार्य प्रारंभ : गेहूं उपार्जन के 35 …

बे मौसम बारिश और ओलावृष्टि के कहर से किसानों के चेहरे पर छाई मायूसी

बे मौसम बारिश और ओलावृष्टि के कहर से किसानों के चेहरे पर छाई मायूसी टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *