Breaking News

शेतात काम करताना निघाला 8 फुटाचा अजगर

Advertisements

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील शेतात काम करीत असताना एक महिला मजुराच्या जवळच आठ फुटाचा भला मोठा अजगर निघाला. अजगराच्या तावडीतून महिला मजूर बचावली. शेवटी भद्रावती येथून सर्पमित्र बोलावून या अजगराचे रेस्क्यू करण्यात आले. सदर घटना ढोरवासा येथे घडली. ढोरवासा येथील सुनील गोवारदिपे यांच्या शेतात महिला मजुरांतर्फे सोयाबीनचे निंदन सुरू असताना एका महिला मजुराच्या जवळच अचानक आठ फूट लांबीचा भला मोठा अजगर निघाला.

Advertisements

या अजगराला अगदी जवळच पाहून ती महिला ओरडत बाहेर पळाली. तिच्या ओरडण्याने बाकी महिला मजूर देखील घाबरून शेताबाहेर पळाल्या. या घटनेची माहिती शेतमालक सुनील गोवारदिपे यांना दिल्यानंतर त्यांनी प्रथम घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनाही तो भला मोठा अजगर आढळून आला. त्यांनी लगेच भद्रावती येथील सर्पमित्रांशी संपर्क साधला असता सर्पमित्र अमृत बावणे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या अजगराला मोठ्या शिताफीने पकडून व त्याची वनविभागात नोंद करून सुरक्षित अधिवासात सोडले. या अजगराची लांबी पाहता या अजगरापासून सदर महिलेला धोका होऊ शकला असता. मात्र या अजगराचे अस्तित्व वेळीच लक्षात आल्यामुळे महिला मजूर यातून बचावली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

जानिए विपक्षी INDIA गठबंधन दलों के नेताओं में फूट की वजह : खास खबर

जानिए विपक्षी INDIA गठबंधन दलों के नेताओं में फूट की वजह : खास खबर टेकचंद्र …

BJP आम आदमी पार्टी को पूरी तरह खत्म करना चाहती है?उसकी वजह जानिए

BJP आम आदमी पार्टी को पूरी तरह खत्म करना चाहती है?उसकी वजह जानिए टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *