Breaking News

नागपूर : अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, घराघरात पाणी, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Advertisements

नागपुरातील हिंगणा आणि एमआयडीसी परिसरात पाणी शिरल्यामुळे तेथील पाणी अंबाझरी तलावात आले आहे. शनिवार पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.

Advertisements

👉मदतीला धावणारे युवक

Advertisements

पाण्यात अडकलेल्याना बाहेर काढण्यासाठी विक्की संतोषवार, कपिल पाटील, विजय जाधव,सतीश बोकडे व विजय गौर आणि अन्य जणांनी लोकांना सुखरूप बाहेर काढले.

महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी पोचहचली असून लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. कार्पोरेशन कॉलनी ,कस्तुरबा नगर, डागा ले आऊट, सुभाष नगर येथील पाचशे लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. तीन बोटी घटनास्थळी आले बोटीच्या सहाय्याने लोकांना घराच्या बाहेर काढले जात आहे. शंकर नगरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले.मोरभवन परिसरात पाणी शिरले आहे. बसेस अर्ध्या पाण्यांत असून तिथून लोकांना बाहेर काढणे सुरू आहे.

कस्तुरबानगर आणि डागा ले आउट मधील तेथील अनेक लोक दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील इमारती असलेल्या घरात पोहचले असून काही लोक टेरेसवर उभे आहेत. तलावातील पाणी अजूनही बाहेर येणे सुरू असल्यामुळे डागा ले आउट आणि अंबाझरी येथील लोकांच्या घरातील पार्किंग भरून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले असल्याचे माजी नगरसेविका वर्षा ठाकरे यांनी सांगितले.

शंकर नगर येथील मुकबधीर विद्यालयाच्या परिसरात पाणी शिरल्यामुळे तिथे शंभरपेक्षा अधिक मुले अडकली असून महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

5 जिल्हाधिकऱ्यांची ‘ईडी’कडून चौकशी

पाच जिल्हाधिकाऱ्यांची सक्तवसुली संचालनालयापुढे (ईडी) चौकशी झाली. अवैध वाळू उपसा प्रकरणात चौकशी झाली आहे. यात …

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *