Breaking News

अधिकाऱ्यांनी दिले सचिवांना सोन्याच्या मुलाम्याचे स्मृतिचिन्ह?

Advertisements

छत्रपती संभाजीनगरात १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात मराठवाड्याच्या विकासासाठी सुमारे ४६ हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले. सर्वाधिक २१ हजार कोटींचा निधी हा सिंचन व इतर प्रकल्पांसाठी जलसंपदा विभागाला मंजूर झाला. यात ११,५०० कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतांचाही (सुप्रमा) समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केल्याने आनंदित झालेल्या जलसंपदा विभागातील सुमारे १०० हून अधिक अधिकाऱ्यांनी त्याच रात्री संभाजीनगरातील एका थ्री स्टार हॉटेलात जंगी पार्टी केल्याची विश्व्सनीय माहिती हाती लागली आहे. या पार्टीत शाखा अभियंत्यांपासून सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. संबंधित अधिकाऱ्यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

Advertisements

सचिवांना सोनं दिलं?

Advertisements

सचिवांना सोन्याच्या मुलाम्याचे स्मृतिचिन्ह दिल्याचीही चर्चा आहे. पार्टीपूर्वी गोदावरी महामंडळ भवनात प्रधान सचिव दीपक कपूर आणि सचिव संजय बेलसरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभ असलेले स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. त्याला सोन्याचा मुलामा असल्याची चर्चा होती. मात्र कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी त्याचे खंडन केले. या निव्वळ अफवा व खाेडसाळपणा असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

चित्रपटाची ऑफर नाकारुन झाल्या उपजिल्हाधिकारी

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. …

मतदान में लापरवाही : अधिकारी सहित 3 निलंबित

मतदान में लापरवाही : पीठासीन अधिकारी सहित 3 निलंबित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *