Breaking News

दहा लाखाच्या संत्र्यावर शेतकऱ्याने फिरविला जेसीबी

Advertisements

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.उत्पादन खर्च अधिक व कमी नफा मिळत आहे. त्यातच योग्य दर मिळत नसल्याने वाशीम जिल्ह्यातील पिंपळगाव येथील शेतकऱ्याने चार एक्कर क्षेत्रातील ६ वर्ष जपलेली संत्रा बाग थेट जेसीबी लावून जवळपास ६०० झाडे उपटून टाकली आहेत.

Advertisements

दिवसेंदिवस शेती करणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना बगल देऊन फळ लागवड करीत आहेत. वाशीम तालुक्यातील पिपंळगाव येथील शेतकऱ्याने मोठया आवडीने चार एकारात संत्रा लागवड केली. जवळपास ६ वर्षे मेहनत घेतली. मात्र कमाई न झाल्यामुळे जेसीबीने संत्र्याची झाडे उपटून टाकली. संत्रा बागेतून गेल्यावर्षी बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले, मात्र यातूनही अपेक्षित कमाई झाली नाही; परंतु अचानक संत्र्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला.

Advertisements

दहा लाख रुपये किमतीची संत्री फक्त अडीच लाख रुपयांमध्ये देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. संत्रा बागेतून काहीच उत्पन्न शिल्लक राहत नसल्यामुळे जुबेर खान नूरखान या शेतकऱ्याने मोठमोठ्या संत्रा झाडावर जेसीबी चालवला. सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत झाडांची देखभाल करणे, वेळोवेळी महागडी खते देणे, फवारणी यासाठी लाखो रुपये खर्च करूनदेखील अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.लागवड खर्चही निघत नसेल तर ही संत्रा शेती कश्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लावलेला खर्च ही निघेना

मागील काही वर्षांपासून काही शेतकरी संत्रा लागवड करीत आहेत. चांगले दर मिळतील या आशेपोटी जीवापाड कष्ट करून लहान मुलाप्रमाणे झाडांना जपतात. मात्र योग्य दर मिळत नाही. त्यातच निसर्गाचा लहरीपणामुळे कित्येकदा बागेत चांगली फूट होत नाही. त्यामुळे पूर्ण वर्ष वाया जाते अन् चांगली फूट झालीच तर लाखो रुपयांच्या संत्रा बागेला व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावात मागितले जाते.अश्या दुहेरी संकटात शेतकऱ्यांची कोंडी होते.

४ एकरात, ६०० संत्र्याची झाडे आणि ६ वर्षाचे संगोपन

पिपंळगाव येथील जुबेर खान नूर खान या शेतकऱ्याने सर्व्हे क्र. ७४ मध्ये १० वर्षांआधी ४ एकर क्षेत्रात ६०० संत्रा झाडे लावली होती. ६ वर्षे होईपर्यंत त्याचे चांगले संगोपन केले. पंधरा फूट एवढ्या उंचीची डोलदार झाडे बनली; परंतु गेल्या चार वर्षंपासून लावलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे सर्व झाडे जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकायची वेळ शेतकऱ्यावर आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

किसानों को राहत : चना, मसूर एवं राई सरसों के उपार्जन का कार्य प्रारंभ : गेहूं उपार्जन के 35 केंद्र निर्धारित 

चना, मसूर एवं राई सरसों के उपार्जन का कार्य प्रारंभ : गेहूं उपार्जन के 35 …

बे मौसम बारिश और ओलावृष्टि के कहर से किसानों के चेहरे पर छाई मायूसी

बे मौसम बारिश और ओलावृष्टि के कहर से किसानों के चेहरे पर छाई मायूसी टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *