ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या. पण हे सर्व त्यांनी नाकारले.
ओशिन यांनी आपला मार्ग निवडला आणि त्या हिमाचल प्रशासकीय सेवा (HAS) अधिकारी बनल्या. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
ओशिन यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्या अनेकदा अपयशी ठरल्या पण या अपयशामुळे त्यांनी हार मानली नाही.
ओशिन शर्मा हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शिमला येथे त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील भुवनेश शर्मा नायब तहसीलदार आहेत. आई कांगडा येथील सेटलमेंट ऑफिसरची पीए म्हणून काम करत आहे.
ओशिन यांना कुटुंबात अभ्यासासाठी नेहमीच चांगले वातावरण होते. पूर्वी ओशिनला डॉक्टर व्हायचे होते. त्यानंतर महाविद्यालयीन काळात त्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाल्या. ओशिनने पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
ओशिन अभ्यासात खूप हुशार होत्या. ओशिनचा कल पाहून त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना नागरी सेवांसाठी तयार होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर नागरी सेवेत रुजू होण्याचे त्यांचे स्वप्न बनले.
ओशिन यांनीदेखील नागरी सेवा परीक्षांची जोरदार तयारी सुरू केली. पण 5 गुणांनी त्यांचे नागरी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न भंगले.ओशिन शर्मांसाठी हा धक्काच होता. पण त्यांनी मेहनत सुरूच ठेवली.
सरकारी नोकरीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. अनेक परीक्षा दिल्या. अनेक प्रयत्नांनंतर 2019 मध्ये हिमाचल प्रशासकीय सेवा (HAS) बीडीओसाठी त्यांची निवड झाली.