Breaking News

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवल्यामुळे खोपडे यांची फसवणूक झाली असून या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. प्रवीण कडू (२२) रा. पालघर, तालुका मोकाळा, असे आरापीचे नाव आहे.

२६ एप्रिलच्या रात्री खोपडे हे त्यांचे सहकारी अरुण हारोडे (५०) यांच्यासह दुरंतो रेल्वेने मुंबईला जात होते. या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर प्रवीणचा फोन आला. त्याने आपले नाव व पत्ता सांगून कुटुंबासह प्रवासादरम्यान त्याच्या वाहनाला ठाणे येथे अपघात झाल्याची माहिती दिली. तसेच या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून रुग्णवाहिकाही मिळत नाही व नागपूरला परतण्यासाठी डिझलचे पैसेही नसल्याची बतावणी करीत ६ हजार रुपयांची मागणी केली. आमदार खोपडे यांनी तत्काळ सहकारी हारोडे यांना आरोपी प्रवीणच्या खात्यात ६ हजार रुपये वळते करण्यास सांगितले. अरुण यांनी पैसे वळते केले.

नागपूरला परतल्यावर हारोडे यांनी घटनेबाबत विचारपूस केली असता अशी कुठलीच घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्याच मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता प्रवीणने ५ हजार रुपये ऑनलाईन परत केले. मात्र उर्वरित एक हजार रुपये देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे हारोडे यांनी पाच दिवसांपूर्वी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.

About विश्व भारत

Check Also

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप …

गर्म पानी में झुलसने से मासूम की मौत : परिजन सदमे में

गर्म पानी में झुलसने से मासूम की मौत, परिजन सदमे में टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *