Breaking News

बिअरच्या दुकानासाठी घेतली एक लाखाची लाच : उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा

Advertisements

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि कार्यालय अधीक्षकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.चंद्रपूरचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (५४), दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (३४), कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ (५३) अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Advertisements

घुग्घुस येथील गोदावरी बार अँड रेस्टॉरंटच्या संचालकांनी ‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर येथे अर्ज सादर केला होता. त्यानंतर अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे यांनी परवाना देण्यासाठी टाळाटाळ केली. दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी, बिअर शॉपीचा परवाना मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. गोदावरी बार अँड रेस्टॉरंटच्या संचालकाने २५ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरून पडताळणी कारवाई करण्यात आली. आज सापळा रचण्यात आला.

Advertisements

दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालय अधीक्षक खताळ यांच्यामार्फत तडजोडीनुसार एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. खारोडे आणि अधीक्षक संजय पाटील यांच्या फोनवरून पडताळणी केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय खताळ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील मूळचे कोल्हापूरचे रहिवासी आहेत. ते सध्या सुट्टीवर असून कोल्हापूरला गेले आहेत. त्यांनाही ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश नन्नावरे, हिवराज नेवारे, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम यांच्या पथकाने केली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

100 ग्राम हैरोइन व 7 हजार ड्रग मनी सहित पकड़े गए मां-बेटे को जेल भेजा

100 ग्राम हैरोइन व 7 हजार ड्रग मनी सहित पकड़े गए मां-बेटे को जेल भेजा …

तहसीलदाराच्या कारच्या धडकेने दोघांचा मृत्यू

तहसीलदाराच्या कारच्या धडकेने दोघांचा मृत्यू यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरानजीक आर्णी तहसीलदारांच्या मालकीच्या भरधाव कारने दुचाकीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *