Breaking News

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश

Advertisements

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश

Advertisements

कोल्हापूर मधून लोकसभा निवडणूक लढवणार

Advertisements

कोल्हापूर:- नुकतेच अखिल भारत हिंदु महासभा पक्षात सामील होऊन थेट लोकसभा निवडणुक लढविणारे श्री. शशीभूषण जीवनराव देसाई हे मागील सुमारे २० वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहेत. तसेच सध्यस्थितीत देशातील बहुचर्चित असे सर्वात मोठे संघटन असलेल्या “नरेंद्र मोदी विचार मंच” या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत. २०१७ पासून संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष, प्रांत अध्यक्ष ते सध्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ते कार्यरत आहेत. शशीभूषण देसाई हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्यांचा जिल्ह्यात सुमारे १५० हून अधिक गावामध्ये नातेवाईक, राजकीय तथा सामाजिक मित्रपरिवार असल्यामुळे तसेच संघटनेचे प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा असून संघटनेतील कार्यकर्त्यांचे जाळे महाराष्ट्रभर असल्यामुळे कोल्हापूर लोकसभा निवडणूक जिंकण्याचा दाट आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला असून त्यांनी नुकताच महाराष्ट्रातील त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह स्वातंत्र्यवीर सावरकर प्रणित अखिल भारत हिंदु महासभा पक्षात प्रवेश केला आहे.

 

श्री. शशीभूषण देसाई यांनी हिंदु महासभा पक्षात प्रवेश करण्याची इच्छा हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अरुण माळी यांच्याशी व्यक्त करताना म्हणाले की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांना नतमस्तक होऊन प्रखर राष्ट्रविचारांचा पाईक या नात्याने अखंडपणे जनसेवा करण्याची संधी मिळावी. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत हिंदु महासभा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. अनिल राव पवार आणि प्रदेश उपाध्यक्ष श्री. अरुण माळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शशीभूषण देसाई यांना अखिल भारत हिंदु महासभा पक्षात प्रवेश देऊन कोल्हापूर मधून लोकसभा निवडणूक उमेदवार म्हणून त्यांचे नाव घोषित करण्यात आले असून नुकताच त्यांनी कोल्हापूर येथे त्यांचा निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवीत हिंदु महासभा पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

 

हिंदु महासभा पक्षाचे कोल्हापूर लोकसभा उमेदवार श्री. शशीभूषण देसाई यांच्या निवडणूक प्रचारासाठी अखिल भारत हिंदु महासभा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुन्ना कुमार शर्मा यांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या असून ते राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अभयसिंह कुलकर्णी यांच्या सह कोल्हापुरात निवडणूक प्रचारासाठी उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन श्री. शशीभूषण देसाई यांना देण्यात आले आहे.

हिंदु महासभा पक्षाच्या उमेदवारीमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आता एका नव्या वादळाची चर्चा सुरू झाली असून हिंदु महासभा पक्षाचे उमेदवार कुणाला तारक ठरणार आणि कुणाला मारक ठरणार हीच चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अधिकाऱ्यांनी केली जंगलात ६४० एकर जमीन खरेदी : जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात काय दडलंय?

सातारा जिल्ह्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावात उच्चपदस्थ सरकारी …

छिन्दवाडा में बिजली गिरने से स्ट्रांग रूम के CCTV कैमरे बन्द! अंधेरे की आड में खेला? नकुलनाथ ने की चर्चा

छिन्दवाडा में बिजली गिरने से स्ट्रांग रूम के CCTV कैमरे बन्द! अंधेरे की आड में …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *