काही उमेदवारांनी प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून हजारो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणाचा तीव्र निषेध करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात केली आहे.
मतदार यादीतून नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे हजारो मतदारांना शुक्रवारी नागपूर आणि रामटेक मतदार संघातील नागरिकाना मतदानापासून वंचित राहावे लागले.
नाव वगळण्यात आल्यामुळे झालेला मनस्ताप आणि भर उन्हात नाव शोधण्यासाठी करावी लागलेली वणवण यामुळे हजारो मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
नागपूर शहर आणि रामटेक मध्ये मतदानाला शुक्रवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला आणि थोडय़ाच वेळात यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. तासाभरातच या तक्रारी एवढय़ा वाढल्या की सर्व बूथवर तसेच मतदान केंद्रांमध्ये यादीतील नाव शोधणे हाच उद्योग सुरू झाला.
काही उमेदवारांनी प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून हजारो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणाचा तीव्र निषेध करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे.