Breaking News

तहसीलदारांचा ऑनलाईन सर्विस सेंटरवर छापा : जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

शासकीय अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीचे बनावट कागदपत्रं तयार करुन नागरिकांकडून ते अव्वाच्या सव्वा शुल्क आकारत होते. अशा बनावट व्ही.एस. ऑनलाईन सर्विस सेंटरचा काळाबाजार उजेडात आला. याप्रकरणी वर्धा महसूल विभागासह पोलिसांच्या चमूने ऑनलाईन सेंटरवर कारवाई करुन चौघांना अटक केली आहे.

बनावट कागदपत्रांसह लॅपटॉप आणि महागडी कार असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रशासकीय इमारतीच्या समोरील रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये ऑनलाईन सेंटर चालक विकास कुंभेकर रा. अमरावती याच्यासह त्याची पत्नी आणि दोन ऑपरटेर अशा चौघांचा समावेश आहे.

नितीन मुकुंद सुळे रा. बॅचलर रोड वर्धा याने प्रशासकीय इमारतीच्या समोरील रस्त्यालगत असलेल्या व्ही.एस. ऑनलाईन सर्व्हिस सेंटरमधून उत्पन्नाचा दाखला काढला होता. त्याने महाविद्यालयात दाखला दिला असता महाविद्यालयीन प्रशासनाने केलेल्या पडताळणी दरम्यान उत्पन्नाचा दाखला बनावट असल्याचे सांगितल्या गेले. नितीनने ही बाब त्याचे वडिल मुकुंद सुळे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ याची तक्रार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह पोलिसांना माहिती देत कारवाई करण्यास सांगितले. त्या आधारे महसूल विभागासह पोलिसांच्या चमूने ऑनलाईन सर्व्हिस सेंटरवर छापा टाकला असता सेंटरमध्ये बनावट उत्पन्नाचा दाखला आणि एक बनावट शपथपत्र मिळून आले.

तहसीलदार रमेश कोळपे यांनी पंचनामा केला. पोलिसांनी ऑनलाईन सेंटरमधून तीन लॅपटॉप, दोन प्रिंटर, किबोर्ड, बॅटरी इनव्हरटरसह एक चारचाकी असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सेंटर चालक विकास कुंभेकरसह त्याची पत्नी आणि दोन संगणक चालकांना अटक केल्याची माहिती दिली.

कारवाई तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळू भागवत, अजय धर्माधिकारी, माहिती तंत्रज्ञान शाखेचे प्रकल्प व्यवस्थापक शेहजाद शेख, महाआयटीचे जिल्हा समन्वयक प्रतिक उमाटे यांनी केली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड यांनी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहे.

About विश्व भारत

Check Also

वन अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी लाखोंचा व्यवहार : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

राज्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ निर्माण झाला असून घोडेबाजार देखील सुरू झाला …

राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळे बंद ठेवा : मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे आदेश

राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. पोलीस, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *