Breaking News

चंद्रपूरात नर्सचा मृत्यू

Advertisements

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने परिचारिका लीमा मेश्राम यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेमुळे आरोग्य कर्मचारी आणि परिचकमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Advertisements

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार न मिळाल्याने नर्सचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लीमा मेश्राम असे मृत परिचारिकेचे नाव आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2013 रोजी प्रसूती वॉर्डात नाईटड्युटीला कर्तव्यावर असताना तिला भोवळ आली. तिला रुग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही तपासणी केली नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप करीत सर्व परिचारिका संघटना, महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती शाखा चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी व सदस्य यांनी आंदोलन पुकारले आहे.

Advertisements

सहकारी परिचारिकांनी सांगिलते कि, लीमा मेश्राम या एक समर्पित परिचारिका होत्या. रूग्ण सेवेसाठी त्या रुग्णालयात कर्तव्यावर असताना बेशुद्ध पडली. विशेष म्हणजे, त्याच रुग्णालयात दाखल केल्यानंतर, तिला आवश्यक वैद्यकीय मदत मिळाली नाही, ज्यामुळे तिचा जीव गेला. रात्री सव्वा दोनपासून तर सकाळच्या नऊ वाजेपर्यंत गोल्डन अवर्समध्ये तिच्यावर तपासणी करून निदान करणे आवश्यक असताना उपचार न मिळाल्यामुळे जीव गमावला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य वैद्यकीय तपासणी करून पुरेसे उपचार न दिल्याने निषेध आणि निषेधाची लाट उसळली आहे. संपूर्ण रुग्णालयातील परिचारिकांनी दुःख व्यक्त करीत डॉक्टरांप्रती संताप व्यक्त केला आहे.

लीमा मेश्राम यांचे अकाली निधन हे झालेल्या निष्काळजीपणाचे प्रकरण आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती शाखा चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांसह परिचारिका संघटनेने आंदोलन केले. लीमा मेश्रामच्या मृत्यूला वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशीकरून जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नर्स लीमा मेश्राम यांचे निधन ही केवळ कुटुंबीयांची शोकांतिका नसून, रुग्णालयातील भोंगळ प्रकाराचा पुरावा आहे. त्यामुळे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते हैं उपराज्यपाल

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते …

ग्रहस्थ जीवन में अर्धांगिनी को सुखमय रखने के लिए पूरी ईमानदारी से हाथी की तरह करें काम

ग्रहस्थ जीवन में अर्धांगिनी को सुखमय रखने के लिए पूरी ईमानदारी से हाथी की तरह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *