Breaking News

नागपूरच्या कन्हान नदीत एका तरुण मुलीसह 4 जण बुडाले

Advertisements

नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले चार तरुण बुडाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वाकी येथे ही घटना घडली आहे. माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चारही तरुणांचा शोध सुरु आहे.

Advertisements

कन्हान नदी परिसरामध्ये फिरण्यासाठी काही तरुण आपल्या मैत्रिणींसोबत गेले होते. त्याच वेळी हे सर्वजण नदीमध्ये पाोहण्यासाठी उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तीन तरुण आणि एक तरुणी नदीमध्ये बुडाले. तर सुदैवाने दोन तरुणी बचावल्या आहेत.

Advertisements

विजय ठाकरे, सानिया म्हरसकोल्हे, अंकुश बघेल आणि अर्पित अशी नदीमध्ये बुडालेल्यांची नावं आहेत. या चारही जणांचा शोध सुरु आहे. या चारही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एनडीआरएफकडून त्यांचा शोध सुरु आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *