Breaking News

शिंदे गटाला ‘तलवार’ : ठाकरेंना कोणते चिन्ह मिळेल?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
ठाकरे, शिंदे या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का देत धनुष्यबाण चिन्ह गोठविले. तसेच शिवसेना हे नावही वापरण्यास मनाई केली. आता यापुढे हे दोन्ही गट कोणते चिन्ह वापरणार?असा प्रश्न उभा राहीला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे-सेनेचे तलवार चिन्ह असणार का? ही शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisements

महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोरीनंतर आयोगाने शनिवारी दिलेला निर्णय हा दोन्ही गटांसाठी धक्कादायक ठरला आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपातील असल्याचे देखील आयोगाने सांगितले आहे. आयोगाच्या निकालानंतर आता शिवसेना म्हणून उभ्या राहिलेल्या दोन्ही गटांचे चिन्ह काय असेल यावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक तर्क वितर्क सध्या लावले जात आहेत. शिंदे सरकार आता या निर्णयानंतर तलवार हे चिन्ह घेणार अशी चर्चा सध्या रंगली आहे. तलवार हे एक चिन्ह सोडून आणखी काही चिन्हांची देखील चर्चा आहे. यामध्ये ढाल-तलवार, गदा यांचा समावेश आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

“बड़बड़ करने वाले की जगह क्या है, बताने की जरूरत नहीं”, उद्धव ठाकरे पर देवेंद्र फडणवीस का बड़ा हमला

“बड़बड़ करने वाले की जगह क्या है, बताने की जरूरत नहीं”, उद्धव ठाकरे पर देवेंद्र …

पुणे और नासिक से कौन होगा उम्मीदवार? महायुति में सुलझा सीट शेयरिंग का झगड़ा!

पुणे और नासिक से कौन होगा उम्मीदवार? महायुति में सुलझा सीट शेयरिंग का झगड़ा! टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *