Breaking News

वाळूमाफियाने तहसीलदारांच्या बंगल्याला ठोकले कुलूप

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
अमरावती जिल्ह्यातील वरुडचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे गुरुवारी त्यांच्या शासकीय बंगल्यात होते. रात्री अज्ञाताने त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्य दरवाज्याला बाहेरुन कुलूप लावून घेतले. हा प्रकार तहसीलदार मालठाणे यांना शुक्रवारी (दि. ७) सकाळी साडेपाचच्या सुमारास लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिस बंगल्यावर पोहोचले. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने वरुडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Advertisements

वरुड शहरातच तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान आहे. तहसीलदार त्यांच्या शासकीय निवासस्थानाला असलेला मुख्य दरवाजा रात्रीच्यावेळी आतमधून बंद असतो. दरम्यान शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता तहसीलदार बाहेर आले असता त्यांना मुख्य दरवाज्याला बाहेरुन कुलूप दिसले. हा प्रकार पाहून त्यांनाही धक्काच बसला. या प्रकरणी तहसीलदारांनी पोलिसांना माहिती दिली तसेच शुक्रवारी दुपारी वरुड पोलिसात तक्रारसुद्धा दाखल केली. हा प्रकार अज्ञात व्यक्तीने तसेच वाळूमाफीयांनी केला असल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पर पुरुष गमन और पर स्त्री गमन से उज्ज्वल भविष्य तबाह का भय!

पर पुरुष गमन और पर स्त्री गमन से उज्ज्वल भविष्य तबाह का भय! भारतीय आयुर्विज्ञान …

ट्रेनों मे चोरी करने वाला सातिर गिरोह रेलवे पुलिस की गिरफ्त में

ट्रेनों मे चोरी करने वाला सातिर गिरोह रेलवे पुलिस की गिरफ्त मे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *