Breaking News

दिवाळीत ट्रॅव्हल्स, रेल्वे फुल्ल : तिकीट दरही दुप्पट

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
दिवाळीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी होत असते. कोरोना नियंत्रणात आल्याने या वर्षी प्रवासाला पसंती दिली आहे. त्यामुळेच मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे १० नोव्हेंबरपर्यंतचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेची ही परिस्थिती पाहता खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी हात धुऊन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागपूरहुन पुण्याकडे जाणाऱ्या तिकीट दरात तब्बल दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

Advertisements

दिवाळीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी होते. कोरोना नियंत्रणात आल्याने या वर्षी जालनेकरांनी प्रवासाला पसंती दिली आहे. त्यामुळेच मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे १० नोव्हेंबरपर्यंतचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेची ही परिस्थिती पाहता खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी हात धुऊन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या तिकीट दरात तब्बल दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

Advertisements

मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाची दिवाळी चांगली होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिवाळी, भाऊबीजसाठी घर तसेच माहेर गाठणाऱ्यांना मात्र प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. जालन्यातून मुंबईच्या मार्गावर जाणाऱ्या तपोवन, देवगिरी, नंदीग्राम या गाड्यांची तिकिटे बुक करून ठेवली आहेत. सचखंड या गाडीचीही प्रतीक्षा पंधरा दिवसांपूर्वीपासूनच वाढली आहे. यामुळे यानंतर ट्रॅव्हल्स, त्यानंतर एसटी बस असा पर्याय प्रवासासाठी अवलंबावा लागणार आहे. रेल्वेची भाडेवाड झाली नसून गाड्या आत्ताच फुल्ल झाल्या आहेत. ट्रॅव्हल्सचे दर दुप्पट होणार असल्याने पुढील दोन महिन्यांसाठी दिवसाला प्रवासी भाड्यामध्ये बदल होणार असल्याने पूर्व बुकिंगबद्दल चौकशीच करू नये, असा सल्ला बुकिंगधारकांकडून दिला जात आहे. एसटी महामंडळाकडून शिवशाही बसेसची बुकिंग घेतली जात आहे. इतर साध्या दरातील गाड्यांसाठी १५ ते २० टक्के दरवाढीबाबत ८ ऑक्टोबर रोजीपर्यंत कोणताच निर्णय जालना विभागासाठी दाखल झाला नव्हता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक : नागपूर किती?

दिवसेंदिवस तापमान वाढत आहे.विदर्भात अकोल्याचे तापमान सर्वाधिक नोंदवले गेले. आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद …

पदभरती रखडली : आचारसंहितेनंतर नियुक्ती मिळणार?

राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आचारसंहितेमुळे नियुक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *