Breaking News

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराला राजकारण कळत नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांना गेल्या दहा वर्षांत भंडारा जिल्ह्याचे राजकारण कळू शकले नाही. ते राजकारणात अपरिपत्व आहेत, अशी टीका शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यंनी केली. ते बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात वास्तव्य असलेल्या परिणय फुके यांना भंडारा जिल्ह्यातील भाजपमध्ये मोकळीक दिली. परंतु त्यांना तेथे जम बसवता आलेला नाही. त्यावरून भोंडेकर यांनी फुके यांना डिवचले आहे. गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील भाजप आणि शिंदेसेना यांच्या शाब्दिक द्वद सुरू झाले आहे. आज त्याचा पुढाचा अध्याय सुरू झाला. भोंडेकर म्हणाले, परिणय फुके घाबरले आहेत. त्यांना इतक्या वर्षानंतर भंडारा जिल्ह्याचे राजकारण समजलेले नाही. त्यांच्यात राजकीय परिपक्वता असती तर त्यांनी विनाकारण टीकाटिप्पणी केली नसती. मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांनी त्यांना वेसन घातले पाहिजे, असेही ते म्हणाले.

About विश्व भारत

Check Also

महसूल मंत्री बावनकुळेंच्या कामठी-मौदात मतचोरी : राहुल गांधींच्या आरोपानंतर ३ सप्टेंबरला थेट…

ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या मतदारसंघाचा उल्लेख करत मतचोरीचा आरोप भाजप आणि निवडणूक …

भाजपा की कूटनीति के चलते कांग्रेसियों ने कुत्ते को सौंपा ज्ञापन

भाजपा की कूटनीति के चलते कांग्रेसियों ने कुत्ते को सौंपा ज्ञापन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *