पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करंदी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान मिळाले. शिरूर वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे. करंदी येथील कौडाळ मळा येथील अशोक पर्हाड हे शनिवारी (दि. 5) दुपारच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा पडल्याचे दिसून आले.
यासंदर्भात माहिती त्यांनी शिरूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना दिली. वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, पोलिस पाटील वंदना साबळे पाटील, सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर, गणेश टिळेकर, वैभव निकाळजे, श्रीकांत नायकोडी यांनी तेथे धाव घेतली. विहिरीची पाहणी करत शेख यांनी मोठ्या शिताफीने विहिरीमध्ये पडलेल्या पाण्यातून वर काढले.
विश्वभारत News Website