Breaking News

प्रवाशांची गैरसोय : विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द

सालवा येथे करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवार ६, साेमवार ७ आणि मंगळवार ८ नोव्हेंबरची विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आलीय. दुरंतो, शालिमार-एलटीटी अप-डाऊन ट्रेनच्या मार्गामध्येही बदल करण्यात आला आहे.

भडली येथे करण्यात येणाऱ्या कामासाठी १२११४ नागपूर-पुणे मंगळवारी ८ नोव्हेंबर आणि १२११३ पुणे-नागपूर बुधवारी ९ नोव्हेंबर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना वेळेवर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मुख्य म्हणजे दिवाळीच्या सुट्टीनंतर, नोकरदार, विद्यार्थ्यांसह अनेक मंडळी परत जात आहेत. अशात गाड्या रद्द होत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

About विश्व भारत

Check Also

एसटी बसचा प्रवास १५ टक्क्यांनी महाग; रिक्षा-टॅक्सीच्या दरांत ३ रुपये वाढ

सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बस तसेच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे. एसटीच्या भाडेदरात शुक्रवारी …

वरिष्ठ नागरिकों के लिए रेल में लोअर बर्थ आरक्षण की सुविधा

वरिष्ठ नागरिकों के लिए रेल में लोअर बर्थ आरक्षण की सुविधा   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *