निरोगी आरोग्य ठेवणे अर्थातच तारेवरची कसरत आहे. यासाठी व्हिटॅमिन्स खूप महत्त्वाचे असतात. कारण व्हिटॅमिन्सशिवाय आपल्याला उत्तम आरोग्य मिळू शकत नाही. व्हिटॅमिनमध्येही अनेक प्रकार आहेत. मात्र बहुतेकांना वय झाल्यावर किंवा तरूणपणातच हाडे दुखण्याचा त्रास होतोय. हाडं मजबुत करण्यासाठी विविध पदार्थ सेवन केल्यास त्याचा लाभ होतो.
व्हिटॅमिन बी-12 चे दोन प्रकार
ज्यामध्ये मिथाइलकोबालामीन आणि एडेनोसिलकोबालामिन हे जर आपल्या शरीरात असतील तर आपण अनेक आजारांपासूनही दूर राहू शकतो.
व्हिटॅमिन बी-12 चे फायदे
आपले शरीर तेव्हाच निरोगी असेल जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्याल, व्हिटॅमिन बी 12 समृद्ध अन्न खाल्ल्याने तुमच्या मानसिक आरोग्याला खूप फायदा होतो, कारण यामुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे नैराश्य दूर होते.
जर तुम्हाला दिवसभराचे काम करताना थकवा जाणवत असेल तर समजून घ्या की शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे. या पौष्टिकतेमुळे शरीराला झटपट ऊर्जा आणि शक्ती मिळते. यामुळेच डॉक्टर अशक्तपणा दूर करण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 समृद्ध अन्न खाण्याची शिफारस करतात.
व्हिटॅमिन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मजबूत हाडांसाठी आवश्यक असल्याचे आपण अनेकदा ऐकतो, परंतु यासोबतच व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ देखील सेवन केले पाहिजे कारण यामुळे केवळ हाडे मजबूत होत नाहीत तर ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही कमी होऊ शकतो.
बी-12 कशात?👇👇👇
1 अंडे 2. सोयाबीन 3. दही 4.ओट्स 5. बीट 6. चीज 7. ब्रोकोली 8. मासे 9. चिकन 10. मशरूम
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. _विश्व भारत न्यूज_ पोर्टल याची पुष्ठी करीत नाही.)