Breaking News

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान

Advertisements

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करंदी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान मिळाले. शिरूर वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे. करंदी येथील कौडाळ मळा येथील अशोक पर्‍हाड हे शनिवारी (दि. 5) दुपारच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा पडल्याचे दिसून आले.

Advertisements

यासंदर्भात माहिती त्यांनी शिरूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना दिली. वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, पोलिस पाटील वंदना साबळे पाटील, सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर, गणेश टिळेकर, वैभव निकाळजे, श्रीकांत नायकोडी यांनी तेथे धाव घेतली. विहिरीची पाहणी करत शेख यांनी मोठ्या शिताफीने विहिरीमध्ये पडलेल्या पाण्यातून वर काढले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

उष्णतेने नागपूर बेजार : कोकण वगळता राज्यातील सर्व भागांना फटका

अवकाळीचं सावट अधूनमधून डोकावत असतानाच राज्यात उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाचा आकडा …

४० प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराने!

मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) २०२२-२३ या कालावधीत तब्बल ४० प्राणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *