Breaking News

बुलडाण्याचा उपजिल्हाधिकारी लाखोंची लाच घेताना अटकेत

Advertisements

लाखांचा पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कितीही मिळाले तरी लाच खायची हाव सुटत नाही. बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील भुसंपादन विभागाचा ( मध्यम प्रकल्प) उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 लाख रुपये घेताना रंगेहात पकडले. बुधवार,28 डिसेंबरला सायंकाळी साडेचारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाच्या कार्यालयात ही मोठी कारवाई करण्यात आली. याच प्रकरणात याच कार्यालयातील लिपिक नागोराव खरात याच्यासह वकील अनंता देशमुख या मध्यस्थांनाही एसीबीने पकडले आहे.

Advertisements

प्रकरण काय?

Advertisements

नांदुरा तालुक्यातील हिंगना इच्छापुर येथील एका शेतकऱ्याने या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली होती. तक्रारदार शेतकऱ्याची दीड एकर जमीन जिगाव प्रकल्पात गेली होती. या जमिनीचा मोबदला सरकार कडून जमा झाला होता. मात्र,तक्रारदार शेतकऱ्याचे वडील मयत झाल्याने मोबदल्याची रक्कम तक्रारदार शेतकऱ्याच्या चुलत्याच्या खात्यावर जमा झाली. ही रक्कम तक्रारदार शेतकऱ्याला देण्यासाठी उपजिल्हाधिकारी घुगे याने २लाख १७ हजार रुपयांची मागणी केली. कार्यालयातील लिपिक खरात याच्या माध्यमातून वकील अनंता देशमुख यांच्याकडे ही रक्कम देण्याचे ठरले. दरम्यान या प्रकारानंतर एसीबी कडून तक्रार खरी असल्याची खात्री करण्यासाठी पडताळणी करण्यात आली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

ट्रेनों मे चोरी करने वाला सातिर गिरोह रेलवे पुलिस की गिरफ्त में

ट्रेनों मे चोरी करने वाला सातिर गिरोह रेलवे पुलिस की गिरफ्त मे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

सडक हादसे में पांच लोगों की मौत: 6 घायल, 2 की हालत नाजुक

सडक हादसे में पांच लोगों की मौत: 6 घायल, 2 की हालत नाजुक टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *