रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी नवे पायाभूत सुविधा विकास महामंडळ; आणखी एका महामंडळाची भर, रस्त्यांवरील खड्डे जाणार का ?
रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी नवे पायाभूत सुविधा विकास महामंडळ; आणखी एका महामंडळाची भर, रस्त्यांवरील खड्डे जाणार का ?

महिला पोलीस जागीच ठार : दुचाकीची बैलगाडीला धडक

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे दुचाकीची बैलगाडीला धडक बसून झालेल्‍या अपघातात महिला पोलिस जागीच ठार झाली. सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ असे त्‍यांचे नाव आहे. या दुर्घटनेत त्‍यांचा मुलगा जखमी झाला आहे. ही दुर्घटना भोकरदन रोडवरील राजूरजवळच्या ठाकूरद्वार हॉटेलसमोर रविवारी सकाळी घडली.

सुनीता ढोबाळ आज सकाळी आपल्‍या मुलासह दुचाकीवरून भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर या मूळगावी जात होत्‍या. राजूरजवळ त्‍यांची दुचाकी बैलगाडीला धडकली. सुनीता ढोबाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवित असलेला त्यांचा मुलगा रोहन (वय 18) गंभीर जखमी झाला. सुनीता ढोबाळ या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. त्‍यांच्‍या अपघाती निधनाने पोलीस दलात आणि नातेवाईकांत हळहळ व्यक केली जात आहे.

About विश्व भारत

Check Also

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

नाबालिक से दुष्कर्म : आरोपी को आजीवन जेल की सजा

नाबालिक से दुष्कर्म : आरोपी को आजीवन जेल की सजा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *