Breaking News

नागपुरात रस्त्यातून अधिकाऱ्याचे अपहरण : कारमध्ये टाकून मारहाण

Advertisements

मेट्रोचे अधिकारी हर्षल इंगळे हे सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीतील मिताली बारजवळ उभे होते. तेवढ्यात मागून एक लाल रंगाची कार आली. या कारमधील आरोपींनी हर्षल इंगळे यांना कारमध्ये टाकले. कारमध्ये त्यांना जोरदार मारहाण केली. त्यांच्याजवळ असलेली सोन्याची चैन आणि इतर मौल्यवान साहित्य हिसकावले. पैशाची मागणी केली. पैशाची मागणी पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

Advertisements

आरोपी आणि अधिकारी यांच्यात झटापट
सक्करदरा परिसरातून निघालेली कार व्हेरायटी चौकापर्यंत पोहोचली. आरोपी आणि हर्षल इंगळे यांच्यामध्ये चांगली झटापट झाली. त्यात हर्षल इंगळे कारमधून बाहेर पडले. त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला.

Advertisements

पोलिसांनी घेतला आरोपीचा शोध
त्यानंतर गुन्हे शाखा पोलीस आणि सकरदरा पोलीस यांनी पथक तयार केला. आरोपींचा शोध सुरू केला. बॉबी धोटे हा आरोपी असल्याचं इंगळे यांनी सांगितले. पोलिसांना चेहरा लगेच लक्षात आला. त्यांनी आपले सूत्र कामाला लावत शोध सुरू केला.

बॉबी धोटेसह दोघांना अटक
बॉबी धोटे हा जयताळा परिसरातील एका हॉटेलमध्ये बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या हॉटेलमध्ये पोहोचत त्याला घेरलं. बॉबी धोटेसह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट चारचे तपास अधिकारी सुनील ठवकर यांनी दिली.

नागपुरात मोठी चर्चा उफाळून आली. आता भर रस्त्यातून अशा प्रकारे अपहरण होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागलेत. मात्र ही घटना कुठल्या वादातून झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

हर्षल इंगळे यांनी दोन नंबरचे पैसे तर कमावले नाहीत, अशी शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याचे अपहरण करून मारहाण केली जाऊ शकते, या दिशेने पोलीस शोध घेत आहेत.

बॉबी धोटे कुख्यात आरोपी

नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्याचं अपहरण करून लूटपाट करण्याच्या प्रकरणात नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी एका टोळीला जेरबंद केलं. बॉबी धोटे नावाचा आरोपी ही टोळी ऑपरेट करत होता. बॉबी धोटे हा कुख्यात आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी

शिकायत के खिलाफ श्रमिक नेता बाजनघाटे की ओर से कानूनी नोटिस जारी नागपुर। महानिर्मिती कोराडी …

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *