Breaking News

तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी जागा वाढणार?

Advertisements

तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत एक दिवसाने वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची सोमवारी (दि. १७) संपलेली मुदत मंगळवारी (दि. १८) रात्री उशिरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तलाठी भरतीसाठी अर्ज दाखल करू न शकलेल्यांना दिलासा मिळाला आहे.

Advertisements

महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागाने राज्यात तलाठ्यांच्या 4644 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून भरती करण्याचा निर्णय घेतला आहे .त्यासाठी 26 जून पासून 17 जुलै पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. राज्यभरातून लाखो तरुण-तरुणींनी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केल्याने सर्व्हर डाऊन होण्याचा प्रकार सतत घडत राहिला होता. शिवाय अर्जासोबत जोडण्यासाठी विविध प्रकारचे दाखले आवश्यक होते. दरम्यानच्या काळात महाऑनलाईनची सर्व्हर ही तांत्रिक कारणामुळे काही दिवस बंद राहिल्याने इच्छुकांना मुदतीत दाखले उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यास काही दिवस मुदतवाढ देण्याची मागणी इच्छुकांकडून होत होती. अखेर शासनाने मुदत वाढवली, मात्र ती केवळ एक दिवसच वाढवली आहे. आता 17 जुलै ऐवजी 18 जुलै रात्री उशिरापर्यंत तलाठी पदासाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल. दरम्यान, तलाठी भरतीच्या आणखी एक हजार जागा वाढणार असून राज्यात तलाठ्यांची 5644 एवढी जम्बो भरती होणार आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

चित्रपटाची ऑफर नाकारुन झाल्या उपजिल्हाधिकारी

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. …

मतदान में लापरवाही : अधिकारी सहित 3 निलंबित

मतदान में लापरवाही : पीठासीन अधिकारी सहित 3 निलंबित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *