Breaking News

नागपुरच्या व्यापाऱ्याने गमावले 58 कोटी : वाचा…!

Advertisements

ऑनलाइन गेमच्या नादात नागपुरातील एका व्यापाऱ्याने तब्बल 58 कोटी रुपये गमावले. तक्रारदार नागपूर शहरातील मोठे व्यापारी आहेत. 58 कोटी रुपये गमावल्यानंतर त्यांनी तक्रार केली. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर गोंदियातील आरोपीच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. आरोपीच्या घरातून पोलिसांनी आतापर्यंत अंदाजे 4 किलो सोनं आणि 10 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. मात्र, आरोपी पळून गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Advertisements

पैसे कमवण्याचे आमिष

Advertisements

या प्रकरणातील तकारदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार, अनंत उर्फ सोन्दू नवरतन जैन याने ऑनलाईन गेमिंग अॅपवर 24 तास बेटिंग करून करोडो रुपये कमावता येतील असे प्रलोभन दिले. तक्रारदार यांना कमी कालावधीत फार जास्त पैसे कमावण्याचे लालच दिले. आरोपीने त्यांना ऑनलाईन बेटींग/गेमिंग लिंकचे युझरनेम, पासवर्ड पाठवले. त्यावर दिलेले पॉईंट परत होणार नाहीत, असे बोलून बेटिंग करण्यासाठी बाध्य केले.

४० लाखांची मागितली खंडणी

अनंत जैन याने तक्रारदार यांना ऑनलाईन लिंकवर बेटिंग करण्याची सवय लावली. तक्रारदार हे त्यांचे पैसे रिकव्हर करण्यासाठी त्यांच्या मित्रांकडून उधार पैसे घेतले. आरोपीच्या सांगण्यावरून बेटिंग करीत होते. परंतु, तक्रारदाराला कधीही फायदा झाला नाही. ऑनलाईन बेटिंगमध्ये फक्त आरोपीलाच फायदा होत होता. तक्रारदार यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर फिर्यादीने आतापर्यंत गमावलेले पैसे आरोपीकडे परत मागितले. तेव्हा आरोपीने तक्रारदार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. उलट 40 लाख रुपयांची खंडणी मागितली.

५८ कोटी रुपयांची फसवणूक

अखेर सर्व पर्याय संपल्यानंतर फिर्यादीने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. आरापींनी लिंकमध्ये सेटिंग आणि मॅन्युपुलेशन करून फिर्यादीला बनावट ऑनलाईन लिंकमध्ये खेळण्यास भाग पाडले. तब्बल 58 कोटी 42 लाख 16 हजार 300 रुपयांनी फसवणूक केली आहे. फिर्यादीजवळील सर्व बचत गेमच्या नादात गमावली आहे. एवढंच नाही तर मित्र आणि नातेवाईकांकडूनही कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. फिर्यादीचे आरोपींविरूध्द दिलेल्या रिपोर्टवरून सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

ट्रेनों मे चोरी करने वाला सातिर गिरोह रेलवे पुलिस की गिरफ्त में

ट्रेनों मे चोरी करने वाला सातिर गिरोह रेलवे पुलिस की गिरफ्त मे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

सडक हादसे में पांच लोगों की मौत: 6 घायल, 2 की हालत नाजुक

सडक हादसे में पांच लोगों की मौत: 6 घायल, 2 की हालत नाजुक टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *