Breaking News

22 व्यक्तींचा सेल्फी घेताना मृत्यू

Advertisements

विविध घटनांत नदी आणि तलावात स्नान करताना २२ जणांचा बुडून मृत्यू झाला. मागील २४ तासांतील ही आकडेवारी असून यातील बहुतांश दुर्घटना जीवितपुत्रिका सणासाठी स्नान करताना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisements

दुर्घटनेबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसृत केलेल्या निवेदनानुसार भोजपूरमध्ये पाच, जहानाबादमध्ये चार, पाटणा आणि रोहतासमध्ये प्रत्येकी तीन, दरभंगा आणि नवादामध्ये प्रत्येकी दोन, कैमूर, मधेपुरा आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भोजपूरमधील सोन नदीच्या बहियारा घाटाजवळ शनिवारी १५ ते २० वयोगटातील पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. यातील एक ‘मोबाईल’द्वारे ‘सेल्फी’ घेताना नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली, तर चार जणी तिला वाचवताना नदीत वाहून गेले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *