Breaking News

नागपूर मेट्रोचा अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळ्यानिमित्त मोठा निर्णय

Advertisements

२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराचे रीतसर उद्घाटन होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Advertisements

राम जन्मभूमीचा सोहळा राज्यभरात साजरा करण्यासाठी राज्य सरकाने २२ तारखेला शासकीय सुट्टी घोषित केली आहे. महामेट्रो यात मागे नाही. नागपूर मेट्रोतर्फे २२ जानेवारीला प्रवाशांकरिता तिकिटावर ३० % सुट जाहीर केली आहे. शासकीय रजेच्या दिवशी नागपूर मेट्रो तर्फे ३० % सुट नेहमीच दिली जाते. तोच लाभ या २२ तारखेला (सोमवारी) अयोध्या येथील सोहळ्याच्या निमित्ताने नागपूरकरांना मिळणार असून, यामुळे शहरात आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरता नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास करणे अधिकच सोपे होणार आहे.

Advertisements

नागपूरकरांनी याचा फायदा घेत कार्यक्रमात सहभागी होण्याकरता नागपूर मेट्रोचा वापर करावा हे आवाहन नागपूर मेट्रो करीत आहे. मेट्रो सेवा ठरलेल्या वेळे प्रमाणे सकाळी ६ ते रात्रो १० पर्यंत नेहमीप्रमाणे उपलब्ध असेल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जानिए सर्व रोग व्याधि निवारण के लिए पराम्बा ज्ञान की देवी का मंत्र

जानिए सर्व रोग व्याधि निवारण के लिए पराम्बा ज्ञान की देवी का मंत्र टेकचंद्र सनोडिया …

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *