Breaking News

पंतप्रधान मोदी कन्हान, रामटेकमध्ये येणार : अमित शहा गोंदियात

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली प्रचारसभा रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये होणार आहे. तर गृहमंत्री अमित शहा देखील विदर्भात येत आहेत. १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे रामटेक मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाटय़ाला आला असून राजू पारवे हे तेथील महायुतीचे उमेदवार आहेत.

Advertisements

 

नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदिया व चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. पाचपैकी तीन ठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार आहेत. ‘मिशन-४५’ अभियानानुसार महायुतीने विशेषत: भाजपने या सर्व जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते येणार आहेत.

Advertisements

शहा शनिवारी गोंदियात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ६ एप्रिल रोजी गोंदिया येथे जाहीर सभा होणार आहे. शहा ६ एप्रिलला दुपारी ३ वाजता नागपूर येथे येणार असून येथून ते हेलिकॉप्टरने गोंदियाला जातील. तेथे ४ वाजता सभा होईल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कैबिनेट मंत्री बावनकुळेके करकमलों “PM ई-बस” सेवा का उद्घाटन 

कैबिनेट मंत्री बावनकुळेके करकमलों “PM ई-बस” सेवा का उद्घाटन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर। …

वह नेता कौन? अजित पवार हादसे में खलबली

महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार की एक विमान हादसे में मौत के बाद 10 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *