Breaking News

नागपूर जिल्ह्यात खाणीत बुडून दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरगावातील गर्ग खाणीच्या खड्ड्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सोमवारी सायंकाळी बाहेर काढण्यात आले. त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका युवकाचा समावेश आहे. या प्रकरणी तुर्तास कुही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत्यूमागील सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

 

मृतकात रोशनी चंद्रकांत चौधरी (वय ३२,रा. धुळे), मुलगा मोहित चंद्रकांत चौधरी (वय १२), मुलगी लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (वय १० वर्षे), बहीण अंजली ऊर्फ रज्जो राऊत (वय २५ रा. नागपूर) आणि रज्जोचा मित्र इंतिराज अन्सारी (वय २०वर्षे, रा. नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.

 

रोशनी चौधरी ही मूळची नागपूरची असून बहिण रज्जो राऊतकडे आली होती. मुलगा मोहित, मुलगी लक्ष्मी आणि बहिण रज्जो व तिचा मित्र इंतिराज हे सर्व रविवारी पर्यटनासाठी कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूरगाव येथे गेले होते. दरम्यान, गर्ग खदानाच्या काठावर ते सर्व जण काही वेळपर्यंत बसले होते. पोलिसांच्या अंदाजानुसार, खाणीचा खड्डा होता. तेथील पाणी स्वच्छ असल्याने मुलांनी आंघोळ करण्याचा हट्ट केला असवा.

 

मात्र, खड्डा खोल असल्याचा अंदाज कुणालाच आला नाही. दोन्ही मुले अर्धनग्नावस्थेत असल्यामुळे ते आंघोळ करायला पाण्यात उतरल्याची शक्यता आहे.दरम्यान, मोहित आणि लक्ष्मी पाण्यात बुडत असताना आई रोशनी हिने पाण्यात उडी घेतली असावी. बहिणीला आणि मुलांना वाचविण्यासाठी रज्जोनेसुद्धा पाण्यात उडी घेतली. सर्वच जण पाण्यात बुडत असताना इंतिराज अन्सारी याने त्यांना विचविण्याचा प्रयत्न केला असावा. यादरम्यान, एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात सर्वच जण पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज कुही पोलिसांनी वर्तवला आहे.

 

घटनेची माहिती मिळताच उमरेडच्या पोलीस उपविभागीय अधिकारी वृष्ठी जैन, कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर, कुही पाचगाव पोलीस चौकीचे प्रभारी हरिचंद्र इंगोले, हवालदार दिलीप लांजेवार, कुही पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तातडीने मदतकार्य सुरू केले. नागपुरातील गोताखोर जगदीश खरे यांच्या मदतीने ४ तासांच्या शोध मोहीमेत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह पुढील तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

 

सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, खदान परिसरातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून सुरगाव-पाचगाव परिसरात शेकडो क्रेशर खदान परिसरात सुरक्षेसाठी तातडीने सूचना फलकासह अन्य उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. स्थानिकांनी खदान परिसरात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची मागणी केली. ही घटना सुरगाव ग्रामपंचायत परिसरातील रहिवाशांसाठी धक्कादायक असून या दुर्घटनेमुळे खदान परिसरातील असुरक्षित परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांचे आश्वासन पोलीस आणि प्रशासनाकडून देण्यात आले असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

 

सुरगाव खदानच्या खड्ड्यात पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. त्यांच्या मृत्यूबाबत माहिती काढणे सुरु केले आहे. एकाच कुटुंबातील चौघे अजून एक युवकसुद्धा कुटुंबांच्या परिचयाचा होता. या प्रकरणात तपास सुरु आहे- भानूदास पिदूरकर (ठाणेदार, कुही पोलीस ठाणे)

About विश्व भारत

Check Also

पत्नी की हैवानियत : नौ बच्चों की मां ने करवा दी पति की हत्या

पत्नी की हैवानियत : नौ बच्चों की मां ने करवा दी पति की हत्या टेकचंद्र …

प्यार मे पागल भांजे संग होटल में सुहागरात : पोल खुलते ही खाया जहर

प्यार मे पागल भांजे संग होटल में सुहागरात : पोल खुलते ही खाया जहर टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *