सीमावर्ती भागातील संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण परिसरात नायलॉन मांजाने पुन्हा एकदा कहर केला! बंदी असतानाही पोलीस व प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे एका निष्पाप युवकाचा गळा अक्षरशः चिरला गेला असून तो युवक सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या युवकांवर अकोला येथे शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याला १८ टाके लावण्यात आले असून अजूनही त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
संग्रामपूर येथील शेख अनिस शेख गफार हा युवक आपले दैनंदिन काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना वडगाव वाण गावाजवळ अचानक रस्त्यात लटकलेल्या नायलॉन मांजाने त्याच्या गळ्यावर घाव घातला. क्षणात रक्तबंबाळ झालेल्या युवकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो गंभीर जखमी झाला.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली
प्रारंभी त्याला गंभीर अवस्थेत गळ्याला रुमाल बांधुन ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे आनल्या नंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर अवस्थेत शेख अनिस मिस्त्री यांना त्यांच्या नातेवाईकांनी शासकिय रुग्णालय अकोला येथे हलविले असता शेख अनिस मिस्त्री यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आतुन व बाहेरुन १८ टाके लागले असल्याची माहिती संबंधीत रुग्णावर उपचार करणाऱ्या वैधकिय सुत्रांनी दिली
सध्या त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
परिसरात संतापाची लाट
या घटनेमुळे संपूर्ण संग्रामपूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शासनाने बंदी घातलेला मानवा सह पशु जनावरांच्या जीवितास घातक ठरणारा चायनीज मांजाचा अल्पवयीन मुले सर्रास वापर करीत आहे चायना माजामुळे गरिब मिस्त्रीला गंभीर दुखापत सह सह आर्थिक भुदंड सहन करावा लागला. अलीकडेच सोनाळा पोलीसांनी दोन चायना मांजा विक्रेत्याविरुद्ध कारवाई केली.मात्र पतंग उडविणारी अल्पवयीन मुले चायना मांजाचा सर्रास वापर करित असल्याचे सदर घटने वरुन सिद्ध होत आहे.
सोनाळा पोलीसांनी शासनाने बंदी घातलेला मानवा सह पशु जनावरांच्या जीवितास घातक ठरणार चायनीज मांजा साठवून ठेवणाऱ्या दोघां विरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत सोनाळा पोलीसांनी कारवाई केली मात्र पतंग उडवितांना मानव व पशु जनावरांसाठी घातक असलेला शासनाने बंदि घातलेल्या चॉयना मांजाचा वापर करणाऱ्या विरुद्ध कारवाई होणे गरजेचे आहे.
बंदी असतानाही नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरूच आहे. प्रशासन, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची डोळेझाक किती जीव घेणार? याआधीही अनेकांचे गळे कापले गेले, अपघात झाले, तरी कारवाई फक्त कागदावरच! एखादा मृत्यू झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.
विश्वभारत News Website