Breaking News

ट्रम्प एकटा पडलाय : मित्र देश इराण युद्धातून अमेरिकेपासून दूर

Advertisements

ट्रम्प एकटा पडलाय : मित्र देश इराण युद्धातून दूर

Advertisements

दिनांक २८ फेब्रुवारीला सुरू झालेले युद्ध आज आगीचा गोळा बनला आहे आणि पश्चिम आशिया-आखातामधील संघर्षाची स्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे.अमेरिकेने आपल्या ताकतीच्या बळावर व सुपर पॉवरच्या नावावर इराणला नमविन्याचा प्रयत्न केला परंतु अमेरिकेचा डाव फसला.या युध्दात इराणचे सुप्रिमो अयातुल्ला खामेनेई व बलाढ्य टॉप कमांडर सुध्दा मोठ्या प्रमाणात मारल्या गेले.परंतु इराण थोडासाही डगमगला नाही व अमेरिका-इस्त्रायलला जशास तसे उत्तर देऊन आपली रक्षा करण्यास आम्ही सक्षम आहोत ही बाब जगाला दाखवून दिली.आज जगाला अडचणीत आणण्याचे काम डोनाल्ट ट्रम यांनी केले असून जागतिक संपूर्ण अर्थव्यवस्था धोक्यात आणली आहे.डोनाल्ड ट्रम्प आपल्या वर्चस्वासाठी मित्र देश व नाटो देशांना मदत मागित आहे. या व्यतीरिक्त अमेरिकेचे कट्टर दुष्मण देश रशिया व चीन यांना सुध्दा मदत मागण्याची गरज डोनाल्ड ट्रम्पला पडली आहे.यावरून स्पष्ट होते की, डोनाल्ड ट्रम्प यांची पीछेहाट होत असुन ती लपविण्याचा प्रयत्न करीत आहे.जी संघटना अमेरिकेच्या इशाऱ्यावर चालायची त्या “नाटो”देशांनी या युद्धापासुन दुर रहाण्याचे ठरविले आहे.यावरून स्पष्ट होते की डोनाल्ड ट्रम्प कोणाचाच सहयोगी बनु शकत नाही.कारण तो जगाचा मानवी व आर्थिक हत्यारा आहे ही बाब सुरू असलेल्या युद्धावरून सिद्ध होते.डोनाल्ड ट्रम्पने आपल्या बळाचा वापर करून इराणमधील लाखों आबालवृद्ध, मुलं अशा अनेक निरअपराध्यांचा बळी घेतला यामुळे इराण तिलमिला होने सहाजिकच आहे.त्यामुळे मिडलिस्ट मधील अमेरिकेच्या संपूर्ण सैन्य तळावर हल्ले करून नेस्तनाबूत करण्याचे ठाणले आहे.यात अमेरिकेचे सैन्य मोठ्या प्रमाणात मारल्या जात आहे.परंतु या युद्धाची झळ मध्य पुर्व आशियाई देशांना भोगावी लागत आहे.कारण यात मानवीय व वित्तीय हाणी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि होत आहे.त्यामुळे इराणला नमविने तितकेसे सोपे दिसत नाही. आज या महाभयानक युध्दाचा परिणाम जगातील अनेक देशांना भोगावा लागत आहे.कारण ज्या-ज्या ठिकाणी अमेरिकन लष्करी तळ आहे अशा पश्चिम आशियात (मध्य पूर्व) अमेरिकेचे अनेक लष्करी तळ आहेत, ज्यात कतार, बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती(युएई), जॉर्डन, ओमान,इराक, दुबई आणि सीरिया या देशांचा समावेश होतो.या देशातील नागरिक भयभीत असुन मोठ्या प्रमाणात मानवी व वित्तीय हाणी झाल्याचे दिसून येते.इराणने अमेरिकेची अनेक क्षेत्रांत नाकाबंदी करने सुरू केले आहे व अमेरिकेला युद्ध थांबविण्यासाठी अटी ठेवल्या आहेत.यामुळे इराण अमेरिकेवर हावी होतांना दिसत आहे. आता इराण- अमेरिका-इजरायल युद्ध होर्मुझवर येवून ठेपले आहे.याकरीता इराणची नाकाबंदी करण्यासाठी आणि तेलकोंडी फोडण्यासाठी होर्मुझच्या जलमार्गाच्या आसपास मित्र देश,नाटो, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन,रशिया,चीन यांना इराणवर दबाव टाकण्यासाठी युद्धनौका पाठविण्याची घुटने टेकवुन विनंती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.परंतु सर्वांनीच डोनाल्ड ट्रम्प यांची विनंती धुडकावून लावली.त्यामुळे या युद्धात डोनाल्ड ट्रम्प एकटे पडल्याचे दिसून येते.जगातील २२ ते २५ टक्के तेल वाहू जहाज हार्मुझच्या जलमार्गाने जातात आणि दररोज २० ते २१ दशलक्ष बॅरल तेल वाहतूक येथून होत असते.होर्मुझ हे जगातील तेलाच्या वाहतुकीचे सर्वात महत्त्वाचे ‘चोकपॉईंट’ आहे, कारण या मार्गावर जगभरातील, विशेषतः आशियाई देशांची (भारत, चीन, जपान) ऊर्जा आयात मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.त्याचप्रमाणे तेलाव्यतिरिक्त, जागतिक स्तरावरील द्रवीकृत नैसर्गिक वायूची (एलएनजी) मोठी वाहतूक देखील या मार्गाने होते.या मार्गावरील तणावाचा थेट परिणाम जागतिक तेलाच्या किमतींवर होतो. हार्मुझवर नियंत्रण इराणचे असल्याने कोणीही इराणशी वैरत्व स्वीकारण्यास तयार नाही.इराणने तर अमेरिकेला सरळ धमकी दिली आहे की, हार्मुझच्या जलमार्गावर शत्रृची युद्ध नौका दिसली तर तीला उद्ध्वस्त केली जाईल आणि हिंमत असेल तर युद्ध नौका पाठवावी.त्यामुळे इराणचे कितीही जीवित हाणी व वित्तीय हाणी झाली असली तरी आपल्या स्वाभिमानाची लढाई लढण्यास आम्ही सक्षम आहोत ही बाब इराणने अमेरिकेला दाखवून दिली आहे.आज युध्द सुरू होऊन १६ दिवस झाले असले तरी अमेरिका-इस्त्रायलला जशास तसे उत्तर देवून इराणने आघाडी घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या चुकीच्या निर्णयामुळे जगाची दैन्यावस्था झाली असून सर्वांवर तेल व आर्थिक संकट ओढावले असून पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक स्थितीत येवून पोहोचली आहे.अमेरिकेला १६ दिवसांच्या काळात हजारो बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.परंतु झालेले नुकसान लपवित आहे.रशियन तेलाची आयात भारताने थांबवावी यासाठी भारतावर दडपण आणणारा डोनाल्ड ट्रम्प आता युद्धजन्य परिस्थिती रशियापुढे घुटने टेकले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प भारतासह जगाला सांगतो की,रशिया कडून तेल आयात करा अशा पध्दतीची विनवणी व भिक ट्रम्प मागत आहे.इराणची सुरक्षा यंत्रणा आयारजीसीने संपूर्ण कमांड आपल्या हातात घेतल्याने अमेरिका घायाळ होत असल्याचे दिसून येते.कारण युध्दाची सुरूवात अमेरिकेने आणि युद्ध त्यालाच थांबवावे लागेल.डोनाल्ड ट्रम्प हा सध्याच्या परिस्थितीत जगाचा हत्यारा आहे.डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले तेव्हा त्यांनी अमेरिकेसह जगातील अनेक देशांसाठी मोठ्या अडचणी निर्माण केल्या आहेत प्रथम टेरिफ वॉर आणि आता तिसऱ्या महायुद्धाचा भडका हा अत्यंत गंभीर व चिंताजनक विषय आहे यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पाऊल मागे हटुन अमेरिका- इराण- इस्त्रायल युद्ध थांबविले पाहिजे अन्यथा याचे गंभीर परिणाम अमेरिकेलाच भोगावे लागतील.डोनाल्ड ट्रम यांच्या चुकीच्या निर्णयामुळे अमेरिकेत त्यांची राजकीय कोंडी होतांना दिसत आहे.सैनिकांचा मृत्यू, तेल दरवाढ व बाजारातील घसरणीमुळे अमेरिकन जनतेकडुन तीव्र टीका होत आहे.कारण सध्या सुरू असलेल्या युद्धाचा सुत्रधार फक्त डोनाल्ड ट्रम्पच आहे.त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे इराणसह पश्चिम आशियातील(मिडलिस्ट) देशांची हजारोंच्या संख्येने मानवीय हाणी व मोठ्या प्रमाणात वित्तीय हाणी झाली आहे.अमेरिका खरोखरच स्वतःला सुपर पॉवर आणि लोकशाहीचा देश समजत असेल तर त्याने संवादाच्या माध्यमातून ताबडतोब युद्ध थांबवावेत.जय हिंद.

Advertisements

लेखक

रमेश कृष्णराव लांजेवार

( स्वतंत्र पत्रकार )

मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

ट्रम्प पिसाळल्याने जगात भीती : इराणवर हल्ले मजा म्हणून करणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या खर्ग बेटावर पुन्हा हल्ले चढविण्याची धमकी दिली असून, होर्मुझ …

नागपूर, चंद्रपुरातील विद्यार्थी अडकले दुबई, अबुधाबी,इराणमध्ये

इराण आणि अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबई, अबुधाबी, संयुक्त अरब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *