Breaking News

तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट : उपजिल्हाधिकारी गोत्यात

Advertisements

तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट

Advertisements

भोंदू अशोक खरातच्या अटकेच्या अवघ्या तीन दिवस आधी शिर्डीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांनी खरातची भेट घेतल्याची माहिती बाहेर येत आहे. ही बैठक शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये पार पडल्याचे सांगितले जात असून, ‘विनोद’ नावाच्या व्यक्तीने ही भेट घडवून आणल्याची चर्चा आहे. शिर्डी परिसरात आरोपी अशोक खरातचा विनोद नामक पंटर असल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisements

या बैठकीत नेमके काय झाले, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्या तीन IAS अधिकाऱ्यांची भूमिका काय होती?, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

……….

भोंदू अशोक खरातच्या एकेक संतापजनक लीला आता बाहेर येत आहेत. यापूर्वी एका महिलेने शोषणाची तक्रार केली होती. आता आणखी तीन महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्या आहेत, तर दुसरीकडे खरात याच्या नावावर असलेल्या मालमत्तेबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून, तब्बल ५२ सातबारा थेट खरात आणि कुटुंबीयांच्या नावावर आहेत.

खरात याच्याकडील काही मालमत्ता सामाईक मालकीच्या आहेत. सुमारे दीड हजार कोटींच्या मालमत्ता असल्याचा अंदाज आहे. खरातसाठी जमीन व्यवहार करणाऱ्या सिन्नरच्या दीपक लोंढे यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथक चौकशी करत असतानाच आता आयकर विभागही यात लक्ष घालणार असल्याची माहिती मिळते आहे. खरातच्या नावावरील मालमत्ता, त्याचे उत्पन्नाचे स्रोत आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची तयारी सुरू झाल्याचे समजते. त्यातच मोठ्या रकमेचे व्यवहार असतील तर सर्वांच्या विवरणपत्रांची संयुक्त तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सत्ता की दहलीज पर तामिलनाडु CM की रेस में अभिनेता विजय

सत्ता की दहलीज पर तामिलनाडु CM की रेस में अभिनेता विजय टेकचंद्र शास्त्री: 9822550220 चैन्नई। …

भाजप आमदाराच्या ‘पीए’ची अधिकाऱ्याला शिवीगाळ : जंगल सफारी

भाजपचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *