Breaking News

इराण-इस्राईल युद्ध संपणार?

Advertisements

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाचा शेवट जवळ आल्याची चिन्हे आता दिसत आहेत. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या संघर्षामुळे संपूर्ण जगात उलथापालथ झाली. जगाला इंधन आणि गॅसचा पुरवठा ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो, तिथे हल्ल्याची भीती असल्यामुळे ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला. अनेक देशांच्या भांडवली बाजाराने गटांगळी खाल्ली. सुरुवातीपासूनच अमेरिका आणि इस्रायलतर्फे इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतली गेली. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प नरमल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisements

 

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत असताना ट्रम्प यांनी मंगळवारी इराणविरोधातील लष्करी मोहीम पुढच्या दोन ते तीन आठवड्यात संपविण्याचे संकेत दिले. यामुळे मध्यपूर्वेत महिनाभरापासून सुरू असलेला संघर्ष थांबेल आणि जागतिक ऊर्जा बाजाराला पुन्हा गती मिळेल, असे संकेत मिळत आहेत.

Advertisements

 

डोनाल्ड ट्रम्प इराण युद्धाबद्दल बोलताना म्हणाले की, आम्ही लवकरच इराणमधून बाहेर पडू. इराणमधील माघार कदाचित पुढील दोन आठवडे किंवा तीन आठवड्यात होऊ शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे. अमेरिका या संघर्षातून बाहेर पडणार असे स्पष्ट संकेत यानिमित्ताने ट्रम्प यांनी दिले आहेत.

 

संघर्ष थांबविण्यासाठी कराराची गरज नाही

इराणवर करार करण्यासाठी काही दिवसांपूर्वी दबाव टाकू पाहणाऱ्या ट्रम्प यांनी आता आश्चर्यचकीत करणारे विधान केले आहे. संघर्ष संपविण्यासाठी अमेरिकाला इराणबरोबर राजनैतिक करार करण्याची गरज नाही, असेही ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

इराणला आम्ही पाषाण युगात ढकलल्यानंतर आणि त्यांच्याकडे आता अणुबॉम्ब विकसित करण्याची क्षमता शिल्लक राहिलेली नाही, याची खात्री केल्यानंतरच ही मोहीम संपेल आणि आम्ही तिथून निघू, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अमेरिकी आयोग अपनी रिपोर्ट में भारत कें धार्मिक स्वतंत्रता पर चिंतित 

अमेरिकी आयोग अपनी रिपोर्ट में भारत कें धार्मिक स्वतंत्रता पर चिंतित   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

ट्रम्प पिसाळल्याने जगात भीती : इराणवर हल्ले मजा म्हणून करणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या खर्ग बेटावर पुन्हा हल्ले चढविण्याची धमकी दिली असून, होर्मुझ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *