Breaking News

गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा

चंद्रपूर:- पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी आय.एम.ए. सभागृह, चंद्रपूर येथे हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा विमोचन सोहळा आयोजित  करण्यात आलेला आहे.  या पुस्तकाचे विमोचन प्रसिद्ध विधिज्ञ तथा नगर संघचालक अॅड. रविंद्र भागवत जी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असून आ. सुधिर मुनगंटीवार, माजी वित्त मंत्री , म.रा., श्री. देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष ग्रामिण, डाॅ. मंगेश गुलवाडे, महानगर जिल्हाध्यक्ष, सौ. राखीताई कंचर्लावार, महापौर, सौ. अंजली घोटेकर, माजी महापौर, मनोवेध प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. विजय बदखल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
हंसराज अहीर यांच्या ‘‘सांसदीय कार्याबदद्दल मा. पूर्व राष्ट्रपती भारतरत्न स्व. डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, मा. पूर्व लोकसभा सभापती स्व. सोमनाथ चॅटर्जी, मा. प्रधानमंतत्री नरेंद्र मोदी आदि मान्यवरांनी हंसराज अहीर यांच्याबद्दल काढलेल्या गौरवोद्गारांचे संकलन तथा खासदार म्हणून कोळसा घोटाळा उघडकिस आणलेल्या कार्याचा आणि इतर उल्लेखनीय कार्याच्या माहितीचे संकलनाचे पुस्तक रुपात  प्रकाशन डाॅ. अशोक जिवतोडे, सचिव चांदा शिक्षण प्रसारक मंडळ तथा राष्ट्रीय समन्वयक ओबीसी महासंघ, डाॅ. किर्तीवर्धन दिक्षित, माजी कुलगुरु गोंडवाना विद्यापिठ, डाॅ. एम.जे.खान, ज्येष्ठ बालरोगतज्ञ तथा विभागप्रमुख बालरोग विभाग, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर, अॅड. दत्ता हजारे, माजी अध्यक्ष बार असोशिएशन, अॅड. विनायक बापट, माजी अध्यक्ष बार असोशिएशन, अॅड. अभय पाचपोर यांनी केले असून या पुस्तकाचा विमोचन समारंभ हंसराज अहीर यांच्या वाढदिवस दिनी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व माहिती संकलन शामल अहीर, राजवीर चैधरी यांनी केली असून या कार्यक्रमाचे आयोजन हंसराज अहीर मित्रा परीवार (तथा मिसाबंदी) विजयभाऊ पदलमवार, गिरीष अणे, हेमंत डहाके, सुधिर टिकेकर, नंदकिशोर वेखंडे, अनिल अंदनकर, कृष्णा देशपांडे यांनी केले आहे

About Vishwbharat

Check Also

MVA की बैठक में विधानसभा सीटों पर हुई चर्चा : उद्धव ठाकरे की डिमांड

मुंबई में MVA की बैठक में विधानसभा सीटों पर हुई चर्चा, उद्धव ठाकरे की डिमांड? …

पूर्व सीएम ठाकरे ने CM शिंदे की फोटो पर जूते मारा! संजय निरुपम भडके

पूर्व सीएम ठाकरे ने CM शिंदे की फोटो पर जूते मारा! संजय निरुपम भडके ? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *