ACC कामगारांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन सुरेश मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव BRSP यांनी दिला इशारा
दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी ACC सिमेंट कंपनीला दिले स्मरण पत्र या पत्राव्दारे मागील दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी निवेदन दिले असता त्या निवेदनाला जवळपास 15 दिवस ओलांडून गेले असुन ह्या ACC कंपनीतील GM हे झोपुन उठले नाहीत कि झोपण्याचे नाटक करत आहे. त्या चोर ठेकेदार नितीन शर्मा चे गुलाम आहेत हे कळत नाही. कारण दहा वर्षाचा PF चोरी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कंपनीतील मॅनेजमेंट ची हवा गुल झाली आहे. BRSP जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी ACC कंपनीतील मॅनेजरला मोबाइल द्वारे MD साहेबांशी मिटिंग घ्यावी असे बोलून सुध्दा ACC कंपनीतील मॅनेजर MD ला भेटु सुध्दा देत नाही आहे. या सर्व गोष्टींचा अर्थ हा दिसुन येतो कि मॅनेजमेंट हे त्या PF चोर ठेकेदार सोबत कुठे तरी साठ गाठ जुळलेली दिसत आहे या ACC कंपनीतील एक ठेकेदार असा आहे तर बाकी ठेकेदार कसे असेल हे प्रकरण सुद्धा समोर येत आहे या कंपनीतील सर्व ठेकेदारांची चौकशी करून या ACC कंपनीतील सर्व कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हे PF चोरीचे प्रकरण समोर आणून ACC कंपनीतील चालू असलेला कामगारांवरती शोषण हे लवकरात लवकर थांबले पाहिजे व कामगारांचा जे काही मागण्या आहेत ते लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत अन्यथा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व ACC कंपनीतील कामगार यांना घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला स्मरण निवेदन सादर करताना*
*जिल्हा महासचिव- सुरेश मल्हारी पाईकराव, घुग्घुस शहर अध्यक्ष – शरद पाईकराव, घुग्घुस शहर उपाध्यक्ष- मायाताई सांड्रावार, घुग्घुस शहर महासचिव – अशोक आसमपल्लीवार, घुग्घुस शहर सचिव- जगदीश मारबते,घुग्घुस महिला आघाडी अध्यक्षा रमाबाई सातारडे, भाग्यश्रीताई भगत भावनाताई कांबळे पारिखाताई कांबळे जोशनाताई डांगे, वनिताताई निखाडे, कामीनाबाई हस्तक, पायल तेलंग, प्रवीण यादव, आदित्य सिंह, राकेश पारशिवे अशोक भगत, सोनु फुलकर, इश्वर भेले,दिपक दिप राकेश कातकर, इरफान पठाण, गणेश झोडे, विजय ठेपाले, करण काळबांधे, सलीम पठाण, अमोल वाघमारे, सचिन माहुरे, दत्ता वाघमारे, दिपक गजभिये, मृणाल पाटील, सारंग गाताडे, करण बिराडे, गुरुदास मोहजे*अतिथी देवो भव , ही संस्कृती शिकवणारा आपला देश, पण या देशात असे काही लोक आहे जे स्वतः च्या भ्रमात येवढे मग्न झाले आहेत त्यांना कामगारांन विषय काही आपुलकी दिसून येत नाही आहे, आमचे brsp चे कार्यकर्ते कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गेले होते, पण त्यांना ही मॅनेजमेंट नी चुटकी वाजवून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला , ही मॅनेजमेंट कार्यकर्ते सोभतच असा वागणुक करतात तर सामान्य कामगाराला इथे कशी वागणूक मिळत असेल , हे विचार करण्याची बाब आहे.