घुग्घुस ( प्रभाकर कुम्मरी)- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून दी.1 एप्रिल 2021 रोजी घुग्घुस आठवडी बाजार रंगमंच येथे 30 बेड रूग्णालयाचे बांधकाम लवकर सुरू करण्या करीता बि.आर.एस.पी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ अँड. सुरेश माने सर यांचा मार्गदर्शनाखाली व सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वात हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते . बि.आर.एस.पी च्या या आंदोलनाची दखल घेत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लिखित स्वरूपात लिहुन देण्यात आले की गेल्या सात वर्षांपासून रळखळलेल्या रूग्णालयाचे बांधकाम येणाऱ्या तिन महिन्यात शासनाद्वारे घुग्घुसमध्ये 30 बेडचे रूग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. आता या रुग्णालयात फक्त सहा बेड आहे व घुग्घुस येथील लोकसंख्या चाळीस हजार ते पन्नास हजाराजवळ आहे व या सहा बेडचा रुग्णालयात जवळपास चे सर्व गावातील नकोडा, उसेगाव, वढा, येनक, येनाडी, साखरा, कोलगाव, मुंगोली, शेनगाव, सोनेगाव, अंतुरला, म्हातारदेवी, मुरसा, बेलसनी, साखरवाही, घोनाड, महाकुरला, धानोरा, पिपरी, नागडा, येथील रुग्ण या घुग्घुस रुग्णालयात उपचारासाठी येतात व या रुग्णालयात त्यांना बरोबर उपचार सुध्दा मिळत नाही आहे बि.आर.एस.पी च्या या आंदोलनामुळे घुग्घुस जनतेला व जवळपास या सर्व गावातील जनतेला ग्रामीण रूग्णालयचे लाभ मीळणार आहे. व जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सर्व घुग्घुस वासियांना अभिनंदन देत म्हणाले की या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी संपूर्ण घुग्घुस वासियांचा आशिर्वादा मुळे व संपूर्ण BRSP टिम मुळे हे आंदोलन यशस्वी झाले असा घुग्घुसमध्ये आज इतिहास रचला आहे. शेवटी हे मन शिद्द झाले आहे की “हक्क मांगणे से नही मीलता असे छिन्ना पळता हे” आम्ही घुग्घुसची व चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व बि.आर.एस.पी टीम व मी स्वताः सुरेश मल्हारी पाईकराव चंद्रपूर जिल्हा महासचिव शासनाचे आभार व्यक्त करतो की ज्या प्रमाणे आमच्या आंदोलनामध्ये शासनाने लिखित स्वरूपात लिऊन दीलेल्या पत्रानुसार घुग्घुसच्या जनतेला येत्या तीन महिन्यांत 30 बेड रूग्णालयाचे कामे सुरू करावे व लवकर घुग्घुसमध्ये 30 बेड चे रुग्णालय निर्माण करून द्यावे असा विश्वास शासनाकडून मीळाला आहे. जर तिन महिन्यांमध्ये 30 बेडचे रुग्णालयाचे बांधकाम सुरू झाले नाही तर आम्ही आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशा देखील इशारा देण्यात आला. या वेळेस उपस्थित जे डी रामटेके जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव, जिल्हा युवा अध्यक्ष- मोंटो मानकर, विधानसभा उपाध्यक्ष – योगेश किशोर नगराळे घुग्घुस शहर अध्यक्ष,-शरद पाईकराव घुग्घुस उपाध्यक्ष – मायाताई सांड्रावार, महासचिव – अशोक आसमपल्लीवार, सचिव – जगदीश मारबते, सचिव-सागर बिराडे, घुग्घुस शहर युवा अध्यक्ष – ईश्वर बेले, युवा उपाध्यक्ष – दिपक दिप, वार्ड नं. 1 अध्यक्ष – इरफान पठाण, वार्ड नं. 2 राकेश पारशिवे, वार्ड नं. 6 अशोक भगत, वार्ड नं. 6 उपाध्यक्ष – सचिव माहुरे, नकोडा अध्यक्ष – नैनेश मेश्राम, नकोडा सचिव उपाध्यक्ष – नितीन कन्नाके दत्ता वाघमारे शशीकलाबाई कासे, भाग्यश्रीताई भगत, जोशनाताई डांगे, स्मिताताई कांबळे, भावनाताई कांबळे, दिपाताई निखाडे, व समस्त BRSP घुग्घुस टिम उपस्थित होती,
Check Also
नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी
शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …
नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!
नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …