पालकमंत्राच्या गृहक्षेत्रात पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी*
*कायदा व सुव्यवस्थेचे थिंडवडे*
सिंदेवाही-तालुक्यातील पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेली नवरगाव ग्रामपंचायत येथील ही घटना आहे.देशात महामारीचे संकट ओढवले आहे.अशाही परिस्थितीमध्ये आपल्या जीवाचे रान करून बातमी संकलित करत असतांना आपल्या कुटुंबाची व जीवाची पर्वा न करता पत्रकार बंधू काम करीत आहेत.व लोकशाही बळकटीकरणासाठी अहोरात्र झुंज देत आहेत.त्याचप्रमाणे अश्या झुंज देत असतांना अन्याया विरुद्ध न्यायासाठी लढताना बऱ्याच जीवे मारण्याचा धमक्या ऐकत आपला लढा कायम ठेवत असतो. मग या परिस्थितीत पालकंत्राच्या क्षेत्रात पत्रकारांना पालकामंत्राच्या निकटवर्तीय विनोद लोणकर याने पत्रकार अमोल निनावे यांना जीवे मारण्याची धमकी देणे म्हणजेच लोकशाहीची गळचेपी करत आहेत.सविस्तर वृत्त असे आहे की अमोल निनावे यांनी व अनेक वृत्त प्रसार माध्यमांनी नवरगाव ग्रामपंचायतची बातमी आठवड्यापूर्वी नवरगाव ग्रामपंचायतचा अजबच कारभार,बोटावर मोजण्या इतक्या घरी केले सॅनिटायझर फवारणी या मथड्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने विनोद लोणकर यांनी अमोल निनावे यांना फोनवरून संपर्क करून अश्लील शिवीगाळ तू बाहेर भेट कधी मी तुला घरी येऊन मारतो.ह्या प्रकारच्या अश्लील शब्दात पत्रकाराची सामाजिक मानहानी केली आहे. त्यामुळे यावर योग्य भारतीय पत्रकार संरक्षण कायदा संहिता भा द वि कलमांचा वापर करून त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढे जाऊन अश्या दलालांची असं बोलण्याची हिम्मत होणार नाही. त्यातल्या त्यात सन्मानीय चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या क्षेत्रात हा अनुचित प्रकार व पत्रकारांशी गैरवर्तणुक करणे हे कितपट योग्य आहे.